Thu, Jan 15, 2026
प्रशासन

राजभवन येथील चंद्रशेखर साखरे शासकीय सेवेतून निवृत्त

राजभवन येथील चंद्रशेखर साखरे शासकीय सेवेतून निवृत्त
Ashok Ithape
  • PublishedDecember 5, 2024

सातारा दि. 4 :  महाबळेश्वर येथील राजभवन मधील कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असणारे चंद्रशेखर मारुती साखरे वयोमनानुसार दि. 30 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त झाले. त्यांना सत्पनीक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या निरोप समारंभाला पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागकाचे उप अभियंता श्री निशिकांत पायाळ,  शाखाधिकारी अमिता पाटील थोरात सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी तसेच राजवनमधील तसेच नगरपालीका, एमटीडीसी येथील अधिकारी व, कर्मचारी उपस्थित होते.

श्री. साखरे यांनी राजभवन येथे कार्यरत असताना राजभवनाची चांगल्या प्रकारे देखभाल व दुरुस्ती केली. त्यांच्या मनमेळावी स्वभावामुळे त्यांना कोणत्याही काम अडचणी आली नाही. राजभवनात राहण्यासाठी येणाऱ्या  प्रत्येकाची आपुलकीने चौकशी करीत असे.

त्यांच्या कारकीर्दीत अनेक व्हीआयपी राजभवनात राहण्यासाठी येत होते. त्यावेळी त्यांनी चागल्या पद्धतीने आपली सेवा बजावली आहे.   आयुष्य आरोग्यदायी, सुख समाधानाचे जावे अशा शुभेच्छा सेवानिवृत्त समारोपाप्रसंगी उपस्थितांनी दिल्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!