Mon, Mar 2, 2026
प्रशासन

खडतर परिश्रम व स्पर्धा परीक्षेतून सुजाता वरेची वाई विश्वकोष कार्यालयात नियुक्ती

खडतर परिश्रम व स्पर्धा परीक्षेतून सुजाता वरेची वाई विश्वकोष कार्यालयात नियुक्ती
Ashok Ithape
  • PublishedSeptember 24, 2024

नवनियुक्त विविध पदातील उमेदवारांना राज्याचे मराठी भाषा मंत्री ना. दीपक केसरकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

वाई : ‘मराठी विश्वकोशाचे’ अद्ययावतीकरण व अन्य उपक्रमांना अधिक पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे’, असे प्रतिपादन राज्याचे मराठी भाषा मंत्री ना. दीपक केसरकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाकडील नवनियुक्त संपादकीय सहायक व शिपाई या गट क संवर्गातील उमेदवारांना नियुक्तपत्रे मा. दीपक केसरकर यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते, याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव डॉ. शामकांत देवरे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे प्रभारी सहायक सचिव श्री. ललित कुडमथे, वरिष्ठ लिपिक शीतल शिंदे उपस्थित होते.

मराठी विश्वकोशाच्या मुंबई व वाई येथील कार्यालयातील अनेक पदे सन २०१५ पासून रिक्त होती. यासाठी सचिव डॉ. शामकांत देवरे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करून पदभरती प्रक्रिया राबविली. सदर पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करून दि. १६ मार्च रोजी परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत गुणवत्ताप्राप्त उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना आज नियुक्तीपत्रे देण्यात आली. या नवीन निवडीमुळे विश्वकोश कामाला अधिक कुशल मनुष्यबळ मिळाल्याने संकेतस्थळावर नवीन नोंदी घेणे, कुमार विश्वकोश, जुन्या खंडांचे अद्ययावतीकरण या कामकाजाला मोठी गती येणार आहे. याबद्दल सचिव डॉ. शामकांत देवरे यांनी समाधान व्यक्त करून मा. मंत्री महोदय आणि मराठी भाषा विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!