Mon, Mar 2, 2026
महिला विशेष सातारा जिल्हा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळ्याचे साताऱ्यात रविवारी आयोजन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळ्याचे साताऱ्यात रविवारी आयोजन
Ashok Ithape
  • PublishedAugust 16, 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  साताऱ्यात रविवारी आयोजन
सातारा दि.16 (जिमाका): मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रम रविवार दि. 18 ऑगस्ट रोजी दुपारी 12.15 वाजता सैनिक स्कूल मैदान, सातारा येथे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल  विकास विभाग मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!