Fri, Apr 17, 2026
महिला विशेष सातारा जिल्हा

‘लाडकी बहीण’ योजनेच्या निमित्ताने भव्य मेळाव्याचे आयोजन : आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

‘लाडकी बहीण’ योजनेच्या निमित्ताने भव्य मेळाव्याचे आयोजन : आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले
Ashok Ithape
  • PublishedAugust 16, 2024

रविवार दि. १८ रोजी दु.१२:१५ वा. सैनिक स्कुल मैदान सातारा येथे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस आणि ना. अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत ‘लाडकी बहीण’ योजनेच्या निमित्ताने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

भुईंज : महेंद्रआबा जाधवराव

आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या “सुरुची” जनसंपर्क कार्यालयात या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक आज दुपारी पार पडली. या बैठकीला सातारा शहर आणि सातारा व जावली तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही. त्यामुळे विरोधकांच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, याबाबत आपापल्या भागात जनजागृती करावी, असे आवाहन करीतच रविवारी होणा-या मेळाव्याला प्रत्येक गावातून जास्तीत जास्त महिला उपस्थित राहाव्यात याचे योग्य नियोजन करा, अशा सूचना आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थितांना केल्या.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!