नोबेल विजेते प्रा.मोहम्मद युनुस यांनी बांगलादेशमध्ये नव्या पदाची जबाबदारी स्वीकारली
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2024
बांगलादेशमध्ये नव्याने स्थापन झालेल्या हंगामी सरकारच्या प्रमुख सल्लागारपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल नोबेल पारितोषिक विजेते प्रा.मोहम्मद युनुस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
या शेजारी राष्ट्रामध्ये परिस्थिती सुरळीत व्हावी तसेच हिंदू आणि इतर अल्पसंख्यक समुदायांच्या सुरक्षिततेची इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“प्रा.मोहम्मद युनुस यांनी स्वीकारलेल्या नव्या जबाबदाऱ्यांबद्दल माझ्याकडून त्यांना शुभेच्छा. तेथील जनजीवन लवकरात लवकर सुरळीत होईल आणि तेथील हिंदू तसेच इतर अल्पसंख्यक समुदायांची सुरक्षा आणि संरक्षण यांची सुनिश्चिती होईल अशी आम्हाला आशा आहे. शांतता, सुरक्षितता तसेच विकासासाठी आपल्या दोन्ही देशांतील जनतेच्या सामायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बांगलादेशसह एकत्रितपणे काम करण्यास भारत वचनबद्ध आहे.”













