Thu, Jun 4, 2026
अध्यात्म

भुईंज येथे श्री नारायण ज्ञानबोध ग्रंथ पारायण सोहळ्याचे संयोजन

भुईंज येथे श्री नारायण ज्ञानबोध ग्रंथ पारायण सोहळ्याचे संयोजन
Ashok Ithape
  • PublishedAugust 6, 2024

श्री क्षेत्र भुईंज येथे शनिवार दिनांक १० ऑगष्ट पासून श्री नारायण ज्ञानबोध ग्रंथाचे पारायण, आण्णांच्या लेकीगुप व ग्रामस्थांच्यावतीने भव्य सोहळयाचे संयोजन.

भुईंज l प्रतिनिधी

श्री क्षेत्र भुईंज येथे आचार्य भृगुऋषी मठावर श्री नारायण ज्ञानबोध ग्रंथाचे पारायण पठण कार्यक्रमाचे संयोजन महिला भाविक व आण्णांच्या लेकीगुप, ग्रामस्थ यांच्या सहभागाने शनिवार दि.१० ऑगष्ट ते शुकवार दिनांक १६ ऑगस्ट या दरम्यान संपन्न होणार आहे. यासाठी महिला भाविकांची नाव नोंदणी व उस्फुर्त गर्दी तर युवकांचाहि वाढता सहभाग झाल्याने कृष्णातीरी होणार सदगुरूंच्या कर्तृचाचा जागर

श्री क्षेत्र भुईंज येथील संथ वाहणा-या कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या आचार्य भृगूमहर्षीच्या आश्रामात (मटात) वी क्षेत्र नारायणपूर येथील विश्व चैतन्य प.पू. श्री सदगुरू नारायण महाराज उर्फ आण्णा महाराज यांनी लिहीलेल्या नारायण ज्ञानवोध ग्रंथाचे पारायण भुईंज आणि परिसरातील महिला भाविक सेवेकरी यांच्या सहभागातून सुरू होणार आहे. श्रावण महिन्यातील व्रतवैकल्यात ग्रंथांचे पारायण घरोघरी होत असते परंतु भुईंज येथील महिला सेवेकरी यांनी सलग चौथ्या वर्षी या पारायण सोहळयाचे नियोजन केल्याने त्यांना वाचक महिला व श्रोते वर्गास उस्फुर्त प्रतिसाद लाभात आहे.

याच ग्रंथात सदगुरूंनी भस्म महिमा व भुईजच्या भृगुऋषी मठाचा जिर्णोद्धार कसा झाला याचे हि महात्म्य सांगताना नव्या पिढीला खूप काही ज्ञान मिळते असे या ग्रंथाचे महात्म सांगणा-या महिला सेवेकरी मी राजश्री भोसले पाटील यांनी सांगितले. या सोहळयात सदगुरू आण्णा महाराज व पोपट महाराज स्वामी जेष्ठ शिष्य भरतनाना क्षीरसागर हे भेट देवून मार्गदर्शन करणार आहेत. या सोहळयाची सांगता शुक्रवार दिनांक १६ ऑगष्ट २०२४ रोजी होणार आहे.

वा सोहळयाची तयारी दत्तसेवेकरी मंडळ आचार्य भृगुऋषी मठ सेवेकरी ज्ञानेश्वरी पारायण मंडळ जेष्ठ नागरिक संघ भुईंज व ग्रामस्थ यांनी सुरू केली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!