व्याहळी कॉलनी व एकसर गावच्या ग्रामस्थांकडून नुतन नायब तहसीलदार अतुल मर्ढेकर यांचे अभिनंदन.
वाई l प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासन यांच्याकडून पसरणी गावचे रहिवासी व तहसील वाईचे शासकीय अधिकारी अतुल मर्ढेकर यांची वाई तहसील कार्यालयात पदोन्नतीने नायब तहसीलदार संजय गांधी योजना, तहसील कार्यालय वाई या पदावर पदोन्नती झाली आहे.
मर्ढेकर हे 1999 मध्ये शासकीय सेवेत रुजू झाले.
प्रांत ऑफिस वाई येथे 1999 ते 2009 पर्यंत लिपिक पदावर यशस्वी काम केले. त्यानंतर पदोन्नतीने
2009 ते 2013 मध्ये तहसील कार्यालय वाई येथे पुरवठा अव्वल कारकून वाई म्हणून कार्यभार पाहिला.
2013 ते 2017 मध्ये खंडाळा तहसील कार्यालय येथे महसूल अव्वल कारकून म्हणून काम पाहिले.
2017 ते 2021 या कालावधीत महाबळेश्वर तहसिल कार्यालय येथे महसूल अव्वल कारकून व प्रभारी महसूल नायब तहसीलदार म्हणून कार्यरत झाले.
2021 ते 2024 पर्यन्त पुरवठा निरीक्षक, तहसील कार्यालय वाई चे काम पाहिले.
स्वच्छ व निष्कलंक सेवेमुळे महाराष्ट्र
शासनाने त्यांना जुलै महिन्यामध्ये नायब तहसीलदार, संजय गांधी योजना, तहसिल कार्यालय वाई या पदावर पदोन्नतीने रुजू केले.
त्यांना मिळालेल्या पदोन्नती बद्दल व्याहळी कॉलनी गावच्या सरपंच सुजाता कांबळे, माजी उपसरपंच सविता थोरवे, विजय थोरवे, प्रशांत थोरवे (पत्रकार ) संतोष देशमुख, एकसर गावचे ग्रामस्थ विशाल कळंबे, अभिजीत घाडगे, महेश चव्हाण, अनिकेत तरडे, सागर घाडगे, अक्षय घाडगे, संदीप घाडगे व मोठ्या संख्येने आलेल्या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी नायब तहसीलदार अतुल मर्ढेकर यांचे त्यांच्या दालनात जाऊन स्वागत व अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.













