Mon, Mar 2, 2026
प्रशासन सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट नागरिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट नागरिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
Ashok Ithape
  • PublishedJuly 8, 2024

हवामान विभागाने सातारा जिल्यामध्ये दि. ८ ते ९ जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार (रेड अलर्ट) पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

त्याअनुषंगाने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे.

सातारा दि. ८ (जि.मा.का.)

दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. व स्वत:हुन सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.
मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये.
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे.

जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नका.
नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.
पर्यटन स्थळे उदा. धबधबे, धरण परिसर, घाटमाथा इत्यादी ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव जाणेचे टाळावे.

पाऊस पडताना विजा चमकत असल्यास झाडाखाली आश्रय घेऊ नका, व मोबाईलचा वापर करू नका .

प्रवास करतेवेळी घाट रस्याासत विनाकारण थांबु नये.
अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!