Thu, Jan 15, 2026
प्रशासन

वाई तालुक्यातील रेशनिंग दुकानदार झाले हायटेक

वाई तालुक्यातील रेशनिंग दुकानदार झाले हायटेक
Ashok Ithape
  • PublishedJune 11, 2024

वाई तहसील कार्यालयामध्ये अत्याधुनिक फोरजी मशीनचे वाटप

वाई l प्रतिनिधी:

शिधापत्रिका धारकासाठी त्वरित धान्य मिळावे यासाठी शासनामार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी सौ वैशाली राजमाने तसेच वाई तहसीलदार सौ. सोनाली मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सौ.वैशाली जायगुडे- घोरपडे, निवासी नायब तहसीलदार आणि श्री.भाऊसाहेब जगदाळे, महसूल नायब तहसीलदार यांचे हस्ते वाई, पुरवठा शाखेचे अधिकारी श्री.अतुल मर्ढेकर, श्री.राजेंद्र कांबळे व त्यांचे सर्व सहकारी यांच्या नियोजनातून वाई तालुक्यातील सर्व दुकानदारांना आज नविन 4G मशीनचे वाटप करण्यात आले.

यावेळी वाई तालुका रास्त भाव दुकानदार संघटना अध्यक्ष अनिल मांढरे व उपाध्यक्ष संजय जायगुडे व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वाई तालुक्यातील सर्व दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे नवीन मशीन कसे वापरायचे याचा डेमो व संपूर्ण सविस्तर माहिती श्री. नितिन गाडे व सहकारी सातारा यांनी दिली. यावेळी त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी यांनी प्रशासनास पूर्ण सहकार्य करू असे आश्वासन दिले या मशीनमुळे ग्राहकांचा वेळ व दुकानदारांचा त्रास कमी होणार असून नवीन पद्धतीच्या सर्व ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या मशीन मध्ये आहेत. त्यामुळे जिल्हा पुरवठा शाखेचे तसेच वाई पुरवठा शाखेचे व प्रशासनाचे तालुका संघटने कडून आभार व्यक करण्यात आले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!