Mon, Mar 2, 2026
सामाजिक

ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार जाहीर

ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार जाहीर
Ashok Ithape
  • PublishedJune 2, 2024

डॉ.अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा येथे ९ जून २०२४ रोजी गौरव सोहळ्याचे आयोजन

सन २०२४ चे ईगल फौंडेशनचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर चे सहाय्यक कुलसचिव डॉ.शिवाजी नारायणराव शिंदे, समाजकल्याण आयुक्तालय पुणे च्या उपसंचालक श्रीमती निशादेवी संभाजी बंडगर (वाघमोडे), दै.स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.किशोर पाटील,श्री गणेश आखाडा भाईंदरचे वस्ताद श्री वसंतराव पाटील ,दै.तरुण भारतचे आष्टा येथील पत्रकार सुनिल एकनाथ पाटील,कोल्हापूर येथील पत्रकार श्री अमोल पांढरे (इलेक्ट्रॉनिक मिडिया), पत्रकार श्री बाळासाहेब कोळेकर (इलेक्ट्रॉनिक मिडिया),श्री अविनाश रामचंद्र गायकवाड,आर.एस.पी.ऑफीसर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी, डॉ.मीना प्रमेंद्र श्रीवास्तव, दै.महासत्ता चे शिराळा प्रतिनिधी श्री विनायक गायकवाड, सौ.अर्चना सुरेश पाटील ,मुंबई हायकोर्ट वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड विकास कोळेकर ,प्रा.डॉ.जयसिंग होनाजी गाडेकर, श्री माधव मंचकराव मुंडे ,श्री रामराजे फड खादगांवकर , श्री संजय वाघमोडे, श्री तानाजी मारुती पाटील, संध्या अंकुश जानकर, सौ.पल्लवी वढवेकर बर्वे ,गंधारधून.. संस्था , श्री सुनील यशवंत हळदणकर, श्री सुरेश केसरकर , श्री प्रशांत पुजारी वाडीकर, श्री निलेश बाळाराम पाटील, श्री विक्रम राजाराम धुमाळ,श्री बापू पांडुरंग जेधे यांना जाहीर करण्यात आला आहे.

सदर सोहळा रविवार दि.९ जून २०२४ रोजी आष्टा येथील मा.डॉ.अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल सभागृह आष्टा ता.वाळवा जि.सांगली येथे सकाळी १०.३० वाजता संपन्न होत आहे. सदर सोहोळ्यासाठी अनेक वृत्तपत्राचे संपादक , इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे विशेष प्रतिनिधी, पत्रकार, व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सदर सोहोळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन ईगल फौंडेशनचे पदाधिकारी यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!