पाचगणी येथे पिंच्याक सिलॅट स्पर्धेचा रंगणार थरार – विविध राज्यातील 300 खेळाडू घेणार सहभाग
वाई l प्रतिनिधी –
इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशनच्या (IPSF) मान्यतेने महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशने (MPSA) १ मे ते ३ मे २०२४ रोजी ५व्या वेस्ट झोन पिंच्याक सिलॅट स्पर्धा २०२४ सर्व वयोगटातील मुल मुली साठी सेंट पिटर स्कूल पाचगणी येथे अयोजित केली आहे.
या स्पर्धेमध्ये यजमान महाराष्ट्र, गोव, गुजरात, दादरा नगर हवेली दमण आणी दिव, मध्यप्रदेश, राजस्थान या विविध राज्यातील ३०० खेळाडू सहभागी होणार आहेत या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन दि.१ मे २०२४ रोजी श्री किशोर येवले राष्ट्रीय अध्यक्ष इंडियन पिंच्याक सिलॅट फेडरेशन, आमीन हाजीफिल्म (अभिनेता ,निर्माता, संचालक),विल्फ्रेड नोरहोना सेंट पीटर स्कूल चे मुख्याध्यापक,राजेंद्र शेठ राजपुरे संचालक सातारा जिल्हा सहकारी बँक सातारा,अनिल सावंत मा.नगराध्यक्ष वाई नगर पालिका, दीपक ओसवाल मा .नगरसेवक वाई नगरपालिका, विक्रांत भैय्या डोंगरे मा. उपसभापती पंचायत समिती वाई, या मान्यवरांच्या उपस्थीतीत पार पडेल.
संजीव वरे, अरविंद शिर्के, साहेबराव ओहोळ, पौर्णिमा तेली, ,अंशुल कांबले, सुहास पाटील, नागेश बनसोडे, उत्तरेश्र्वर सपाटे, नागेश काळभोर,अमोल कदम, शिवराज वरे, या पदाधिकार्यांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
पिंच्याक सिलॅट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट खेळ प्रकार असून (१) फाईट) (२) (क) (३) रेगु (ग्रुप काता) (४) गंडा (डेमो फाईट) सोलो (क्रिएटिविटी) या पाच प्रकारात खेळला जातो. १ सप्टेंबर २०२० ला या खेळाचा समावेश भारतीय क्रिडा मंत्रालय, भारत सरकार यांनी आपल्या ५% राखिव नोकर भरतीमध्ये केला आहे. या खेळाला युवक कल्याण आणि क्रिडा मंत्रालय भारत सरकार”, “भारतीय विश्वविद्यालय संघ अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड ऑलिम्पिक कांऊमिल ऑफ एशियाची मान्यता आहे.
हा खेळ एशियन गेम, एशियन मार्शल आर्ट्सगेम एशियन यूथ गेम व एशियन बीच गेम, भारतीय विश्वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये खेळला जातो. या खेळाचा समावेश गोव्या मध्ये झालेल्या ३७व्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये १४ मे २०२३ रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने केला होता. त्या मध्ये महाराष्ट्र संघाने १७ पदके मिळवली. या खेळामध्ये मागील १२ वर्ष महाराष्ट्र संघ अव्वल स्थानी आहे एक साहसी व करियर च्या दृष्टीने युवक युवती यांनी स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजन टीमने केले आहे













