Fri, Apr 17, 2026
शिक्षण

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत वाईच्या अभिषेक ओझर्डे यांचे यश

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत वाईच्या अभिषेक ओझर्डे यांचे यश
Ashok Ithape
  • PublishedApril 17, 2024

भुईंज l प्रतिनिधी : सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या UPSC च्या परीक्षेत वाई येथील अभिषेक अभय ओझर्डे यांनी गुणवत्ता यादीत 669 वा क्रमांक मिळवून यश मिळवले.

अभिषेक यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल वाई येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण दिशा अकॅडमी व सांगली च्या वालचंद कॉलेज मधून अभियांत्रिकी पदवी घेऊन बेंगलोर येथे प्रायव्हेट कंपनीत नोकरी करीत UPSC चा अभ्यास केला.

त्यांचे स्वप्न आय. एफ. एस. होण्याचे असून ते नक्कीच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं.
अभिषेकचे वडील हे केंजळ तालुका वाई येथे ग्रामविकास अधिकारी असून त्यानीही स्पर्धा परीक्षेतून PSI होण्याचे स्वप्न पाहिले होते, एका गुणासाठी त्यांची ही संधी हुकली होती मात्र आज मुलगा अभिषेक च्या यशाने त्यांचे स्वप्न साकार झाले या भावना त्यांनी बोलून दाखवल्या.

दरम्यान ही बातमी समजताच वाई पंचायतसमितीच्या वतीने गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, विस्तार अधिकारी rupesh मोरे, राहुल हजारे तसेच वाई तालुका ग्रामसेवक संघटनेचे नेते बाळासाहेब चव्हाण यांचे सह विविध मान्यवरांनी व संस्थांनी  ओझर्डे पिता पुत्रांचे अभिनंदन केले.

भुईंज प्रेस क्लब व आय. एफ. एस. राजेश स्वामी अभ्यासिका यांचे वतीने लवकरच अभिषेक याचा सन्मान सोहळा व प्रकट मुलाखत होणार असल्याची माहिती पै. जयवंत पवार व भुईंज प्रेस क्लबचे संस्थापक जयवंत पिसाळ अध्यक्ष राहुल तांबोळी यांनी दिली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!