Mon, Mar 2, 2026
राजकीय बातमीपत्र

महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचे वाई तालुक्यात जंगी स्वागत

महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचे वाई तालुक्यात जंगी स्वागत
Ashok Ithape
  • PublishedApril 11, 2024

सोमवार दि .१५ एप्रिलला होणाऱ्या शरद पवार साहेबांच्या रॅलीला उपस्थित राहण्याचे आवाहन

भुईंज,ता.११: वेळे ते आनेवाडी दरम्यान प्रत्येक गावातील नाक्यावर आज सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) शशिकांत शिंदे यांचे कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करत जोरदार स्वागत केले. चव्हाण साहेबांचा आणि पवार साहेबांचा सातारा जिल्हा अबाधित राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सातारा लोकसभा मतदार संघातून अखेर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली. पुणे बंगळूर महामार्गावर त्यांचे कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या सातारा जिल्ह्यामध्ये पुरोगामी विचारांची सातत्याने पाठराखण केलेली आहे. यावेळी माझ्या सारख्या कार्यकर्त्याला संधी दिली आहे. प्रथमतः साताऱ्यात प्रवेश होत असताना हा उत्साह तरुण आणि सामान्य जनतेचा आहे या उत्साहाचे प्रतीक एकच आहे की या लोकांच्या मनामध्ये जे आहे ते आपल्याला उस्पूर्तपणे पाहायला मिळत आहे. या सर्वांच्या माध्यमातून सातारा जिल्हा पुन्हा इतिहास घडवेल चव्हाण साहेबांचा आणि पवार साहेबांचा सातारा जिल्हा अबाधित राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी सोमवारी जेष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगून त्यांनी यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहनही त्यांनी केले.

त्यानंतर शिंदे यांच्या वाहनांचा ताफा भुईंजपासून पुढे सातारच्या दिशेने मार्गस्थ झाला. हजारोंच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे यांचे स्वागत झाले. या शक्ती प्रदर्शनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.

छायाचित्र : किशोर रोकडे भुईंज

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!