Mon, Mar 2, 2026
राजकीय बातमीपत्र

लोकसभेच्या विजयाच्या “अजिंक्य” गुढीची मुहूर्तमेढ आज रोवली जाणार..

लोकसभेच्या विजयाच्या “अजिंक्य” गुढीची मुहूर्तमेढ आज रोवली जाणार..
Ashok Ithape
  • PublishedApril 7, 2024

भुईंज : महेंद्रआबा जाधवराव

आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा-जावली तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आज भव्य निर्धार मेळावा. सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवार दि. ८ रोजी सायंकाळी ६ वाजता शेंद्रे येथील स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे महायुतीचा सातारा व जावली तालुक्याचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
या मेळाव्याला महायुतीचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  या मेळाव्यास सातारा आणि जावली तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सर्व नागरिक,  ग्रामस्थ आणि माता- भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!