Sun, Apr 19, 2026
सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यात ईव्हीएम वितरणास सुरुवात – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

सातारा जिल्ह्यात ईव्हीएम वितरणास सुरुवात – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Ashok Ithape
  • PublishedApril 6, 2024

सातारा दि. 05 (जिमाका): जिल्हास्तरावर साठा करण्यात आलेल्या ईव्हीएम चे विधानसभा मतदारसंघ वितरण आजपासून सुरु झाले. जिल्ह्यातील 8 मतदारसंघासाठी आजच्या घडीला 7 हजार 448 ईव्हीएम आणि 4 हजार 364 कंट्रोल युनिट, 4 हजार 488 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. जिल्ह्यात यांचे वितरणाची प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम युनिटची पहिली सरमिसळ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज केली.

          यातील फलटण, कोरेगाव, या विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 45 टक्के बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि 49 टक्के व्हीव्हीपॅट यांचे वितरण करण्यात येणार आहे. तर कराड दक्षिण, कराड उत्तर, या दोन विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी 45 टक्के बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट तर 48 टक्के व्हीव्हीपॅट चे वितरण करण्यात येणार आहे. वाई, माण, या दोन विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 44  टक्के बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि 49 टक्के व्हीव्हीपॅट चे वितरण करण्यात येणार आहे. तर फलटण आणि सातारा या दोन विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 44 टक्के बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि 48 टक्के व्हीव्हीपॅट चे वितरण करण्यात येणार आहे. उर्वरित बॅलेट युनिटचा साठा धान्य गोदामामध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे.

          केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले ईव्हीएम, कंट्रोल युनिट, तसेच व्हीव्हीपॅट मशिन सातारा येथील धान्य गोदामात ठेवण्यात आलेल्या आहेत. सातारा 45 लोकसभा मतदारसंघात 7 मे 2024 रोजी मतदार होणार आहे. ईव्हीएमवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप नसावा त्याचे वितरण पारदर्शक पध्दतीने व्हावे यासाठी सरमिसळ पध्दत अवलंबिण्यात येते असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

          आपतकालीन परिस्थितीत ईव्हीएम, कंट्रोल युनिट, आणि व्हीव्हीपॅट मध्ये बिघाड झाल्यास अतिरिक्त मशिनची सोय ही करण्यात येते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, ईव्हीएम चे नोडल अधिकारी अभिषेक देशमुख, निवडणूक नायब तहसिलदार अनिल जाधव, आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!