Mon, Mar 2, 2026
कृषी वार्ता

प्रतापगड कारखान्याकडून १३ कोटी ५२ लाख रुपये ऊस बिल बँकखाती वर्ग

प्रतापगड कारखान्याकडून १३ कोटी ५२ लाख रुपये ऊस बिल बँकखाती वर्ग
Ashok Ithape
  • PublishedFebruary 7, 2024

भुईंज। महेंद्रआबा जाधव

अजिंक्यतारा- प्रतापगड उद्योग समूहाच्या प्रतापगड सहकारी साखर कारखान्याकडून १६ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे १३ कोटी ५२ लाख ४ हजार रुपये एवढे पेमेंट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती उद्योग समूहाचे मार्गदर्शक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

प्रतापगड साखर कारखान्याचा गळीत हंगाम जोमाने सुरु असून दि. १६ ते दि. ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत ४५०६८.१३३ मे. टन उसाचे गाळप करण्यात आले. या गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ३ हजार रुपये याप्रमाणे १३ कोटी ५२ लाख ४ हजार रुपये एवढी रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खाती दि. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी वर्ग करण्यात आली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँक शाखेत जाऊन खात्री करावी.

दरम्यान, यापूर्वी ५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२३ या कालावधीत ९६५२४.००५ मे.टन उसाचे गाळप झाले होते. त्याचे प्रतिटन ३ हजार रुपये याप्रमाणे २८ कोटी ९५ लाख ७२ हजार रुपये एवढे ऊस बिल यापूर्वीच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करण्यात आले होते. या गळीत हंगामात दि. ५ नोव्हेंबर २०२३ ते ६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत, ९४ दिवसांमध्ये २ लाख ३३ हजार ६३० मे.टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. सरासरी साखर उतारा ११.३३ टक्के असून आज अखेर २ लाख ५९ हजार ९५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!