चिंधवलीत भव्यदिव्य क्रिकेट स्पर्धेला आली नवी नवलाई
![]()
तरुणाईच्या कल्पकतेची झाली कौतुकातून उधळण म्हणूनच चिंधवलीतील नाईट क्रिकेट स्पर्धेचा आलेख वाई तालुक्यात चढताच.
हिवाळा…! कसला आलाय हो हिवाळा… इथं तर ऐन थंडीत मैदानातून वाहिल्या घामाच्या धारा,
हो…! थक्क केलं, अचंबित केलं आणि मनामनात उभा केला समतेचा जागर.
कौतुक मिळालं…! अहो नुसतं कौतुकच नाही तर वाहवा मिळाली, मिळवली आणि कायमच मिळवणार.
हो…! झालच तसं,
कसं…! कसं तर असं प्रत्येकाच्या हातात आहे मोबाईल पण आपली धरणी माय किती मायाळू म्हणूनच तिनं दिलं उर्जेच कोंदण.
ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने, कृष्णामाईच्या सहवासात आणि श्री दत्त गुरुंच्या प्रारंगणात असलेल्या मैदानावर चिंधवलीच्या तरुणाईच्या कल्पकतेला दूरदृष्टीला नेहमीच मैदानाची शिकवण साथ देत असते त्यातूनच आपल्या रुढी, परंपरा आणि शारीरिक मानसिक आणि सामाजिक गोष्टींवर कटाक्षाने लक्ष केंद्रित ठेवून आपली भक्कम वाटचाल सांघिकतेच्या जोरावर पुढे घेऊन जात असतात.
श्री नवलाई क्रिकेट क्लब चिंधवली यांनी नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते सलग आठ दिवस असणाऱ्या भव्य हाफ पिच नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचा नुकताच समारोप झाला, अगदी बक्षीस वितरण समारंभ ही तितक्याच उत्साहाने, उत्सुकतेने पार पडला अगदी वाई, खंडाळा, सातारा तालुक्यातील ३० ते ३५ संघानी सहभागी होत आपलं प्रतिनिधित्व सादर करीत क्रिकेट स्पर्धेत भरिव कामगिरी केली, प्रत्येक मॅच रंगतदार, अगदी उत्कंठा शिगेला पोहोचेल इथपर्यंत उत्साही वातावरणात विशेष उंची गाठत होती, प्रकाशमय साजेश मैदान, मैदानाची नियोजित आखणी, सिमारेषेवर संरक्षक पडद्याचे कवच, स्पर्धकांना, प्रेक्षकांना स्वच्छ सुस्थितीत बसण्यास, पाहण्यास सुसज्ज जागा, नेटके नियोजन, समांतर आखणी आणि कार्यपद्धतीला साजेस समालोचन आणि आयोजक, संयोजक यांची वेळच्या वेळी नियोजित अंमलबजावणी यामुळे पंचवीस तीस किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या संघानी नियम व अटींचे योग्य पालन केल्याने या स्पर्धेचे खेळीमेळीच्या वातावरणात समारोप झाला.
या उत्साही, आनंददायी स्पर्धेला अनेक मान्यवरांनी, हितचिंतकांनी भरिव आणि सढळ हाताने केलेले सहकार्य त्यामध्ये सन्मानीय
श्री यशराज भोसले (भैय्या) प्रथम पारितोषिक रुपये ७००१/-
पै.श्री जयवंत पवार (आबा) द्वितीय पारितोषिक रुपये ५००१/-
श्री जीवन इथापे (युवा नेते) तृतीय पारितोषिक रुपये ३००१/-
कै.जितेंद्र पवार (बाळूनाना) यांचे स्मरणार्थ चतुर्थ पारितोषिक रुपये २००१/-
श्री अनिकेत ऊर्फ चिंटूशेठ इथापे (उद्योजक) पंचम पारितोषिक रुपये १००१/-
चषक–
श्री जगन्नाथ पवार (जगुनाना)
पै.प्रतिक इथापे
पै.राहुल इंगवले
तेजस पवार (शंभू फॅन्स)
सागर महामुनी (उद्योजक)
बाॅल
पै. सूरज पवार
सचिन शेवाळे
पंच
जगन्नाथ पवार
शुभम निकम
विशाल इथापे
सचिन जाधव
मितेश इथापे
गणेश निकम
रुद्र पवार
रनरेट नोंदणी
साहिल पवार
समालोचन
राहुल इंगवले
राजप्रतिक इथापे
मंगल इथापे
नियोजक
अभिषेक इथापे
सागर इथापे
त्याच बरोबर नवलाई क्रिकेट क्लब मधील सर्वच सहकारी यांनी हिरीरीने टप्प्या टप्प्यावर दिलेले योगदान कौतुकास्पद अगदी स्पर्धैला नवी दिशा देण्यासारखेच आणि
त्याच जोडीला चिंधवलीतील अनेक मान्यवर, ग्रामस्थ यांनी पाठिंबा देऊन केलेले विशेष सहकार्य म्हणूनच हा नाईट क्रिकेटचा भव्यदिव्य सोहळा दिमाखात पार पडला अगदी तालुक्यात नाव निघाव इतकाच देखणा दर्जेदार म्हणूनच सहभागी संघानी नवलाई क्रिकेट क्लब चिंधवलीला टिमला कौतुकातून दिली शब्दसुमने.
स्पर्धेचे मानकरी संघ
प्रथम क्रमांक – पाचवड
द्वितीय क्रमांक – अमृतवाडी
तृतीय क्रमांक – व्याजवाडी
चतुर्थ क्रमांक – चिंधवली
पंचम क्रमांक – लिंब
विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवर, सहकारी यांचे विशेष आभार.
दिपक पवार, चिंधवली.













