Mon, Mar 2, 2026
सातारा जिल्हा

वाहनांचा फास्टॅग सुरू ठेवण्यासाठी के.वाय.सी प्रक्रीया पुर्ण करा.

वाहनांचा फास्टॅग सुरू ठेवण्यासाठी के.वाय.सी प्रक्रीया पुर्ण करा.
Ashok Ithape
  • PublishedJanuary 25, 2024

सातारा(जिमाका) दि.24 इलेक्ट्रॅानिक पध्दतीने टोल संकलन सुरू केल्याने देशभरातील टोल नाक्यांवरील गर्दी कमी झाली आहे. वाहनधारकांचा टोलनाक्यावर लागणारा वेळ फास्टॅगमुळे कमी झाला आहे.वाहनधारकांनी 31 जानेवारी 2024 पुर्वी आपल्या वाहनांची के.वाय.सी पुर्ण करून घ्यावी अन्यथा ३१ जानेवारीनंतर फास्टॅग निष्क्रिय होइल याची वाहन धारकांनी नोंद घ्यावी, असे अवाहण राष्ट्रीय प्राधिकरणाकडुन करण्यात आले आहे.

      वाहनधारकांनी के.वाय.सी पुर्ण करण्यासाठी https://fastag.ihmcl.com या वेबसाटवर पुढीलप्रमाणे प्रकीया करावी.आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि पासवर्डच्या आधारे लॉगइन करावे, यानंतर आलेला ओटीपी नंबर टाकून व्हेरीफिकेशनची प्रक्रीया पूर्ण करावी, लॉगइन केल्यावर डॅशबोर्डवर दिसत असलेल्या my profile या ऑप्शनवर जावून केवायसी या पर्यायावर क्लिक करावे,यानंतर आवश्यक असलेले ओळखपत्र तसेच पत्त्याबाबतची संपूर्ण माहिती भरावी,पासपोर्ट आकाराचा फोटो व निवासी पुरावा अपलोड केल्यानंतर फास्टॅगच्या केवायसीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

      चारचाकी वाहनधारकांनी वरिलप्रमाणे आपली केवायसी करून आपला फास्टॅग 31 जानेवारीनंतर निष्क्रीय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडुन करण्यात आले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!