Sat, Jun 13, 2026
Close

Recent Posts

आरोग्य

राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मेवाटप.

राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मेवाटप.
Ashok Ithape
  • PublishedJanuary 25, 2024

राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियान 2024 हे दि. 15-01-2024 ते 14-02-2024 या कालावधीमध्ये राबविण्यात येणारआहे. या अभियानाअंतर्गत दि. 22-01-2024 ते 24-01-2024 या कालावधीत सातारा जिल्ह्यातील रिक्षा चालक, टॅक्सी चालक, खाजगी प्रवासी वाहन चालक, हलके व जड वाहन चालक यांचेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा व स्व. क्रांतीसिंह नाना पाटील, जिल्हा रुग्णालय, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

सदर नेत्र तपासणी शिबीरामध्ये ज्या वाहन चालकांना डोळ्यासाठी नंबरचे चष्मे आवश्यक आहेत असे निदर्शनास आले अशा चालकांना या कार्यालयामार्फत मोफत चष्मे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

त्या अनुषंगाने रिक्षा चालक, टॅक्सी चालक, खाजगी प्रवासी वाहनचालक, हलके व जड वाहनचालक यांचेसाठी नेत्र तपासणी शिबीर दि. 22-01-2024 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, वाई, दि. 23- 01-2024 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, फलटण, दि. 24-01-2024 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, खंडाळा या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. नेत्र तपासणी शिबीरामध्ये तपासणी केलेल्या एकूण तीन तालुक्यातून वाई, फलटण, खंडाळा येथील वाहनचालकांची तपासणी करण्यात आली.

सदर नेत्र तपासणी शिबीरासाठी नेत्र चिकित्सा अधिकारी श्री. विठ्ठल भोईटे, श्री. विलास पाटोळे, श्री. खंडागळे व श्रीमती खंडागळे यांचे योगदान लाभले. या कार्यालयामार्फत मोटार वाहन निरीक्षक श्री. जाकीउद्दीन बिरादार, श्री. अश्विनकुमार पोंदकुले व श्री. गजानन गुरव तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती मोनाली पाटील, श्री. अक्षय खोमणे, श्री. विशाल थोरात, श्री. सत्यजित पाटील व श्री. चेतन पाटील यांनी कामकाज पाहिले.

– (विनोद चव्हाण) प्रादेशिक परिवहन अधिकारी (अ.का.) सातारा

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!