Mon, Mar 2, 2026
देश विदेश महाराष्ट्र

दिल्लीत झळकणार शिवराज्याभिषेकाचा सोहळा; प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ

दिल्लीत झळकणार शिवराज्याभिषेकाचा सोहळा; प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ
Ashok Ithape
  • PublishedJanuary 25, 2024

भुईंज । महेंद्रआबा जाधव –

प्रजासत्ताक दिनाला कर्तव्य पथावर होणाऱ्या पथसंचलनामध्ये राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून सादर करण्यात येणाऱ्या चित्ररथांविषयी भारतीयांच्या मनात उत्सुकता असते. महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय नेहमीच वेगळा असतो.

यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनाच्या वेळी महाराष्ट्राच्या वतीने ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर करण्यात येणार आहे.

यंदाच्या चित्ररथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या
बालपणापासून ते राज्याभिषेक दिवसापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. चित्ररथाच्या समोरच्या भागात दोन महिला योद्धा दांडपट्टा फिरवताना दिसतील. तसेच चित्ररथामध्ये राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारण, समानता, न्याय आणि समता यांचे धडे देताना दिसणार आहेत. त्यांच्या मागे न्यायाचे प्रतीक म्हणून तराजू दाखवण्यात आला आहे. महाराजांची आज्ञापत्रे आणि काही राजेशाही चिन्हे देखील चित्ररथावर दाखवण्यात आली
आहेत.

मध्यभागी अष्टप्रधान मंडळाचा दरबार आहे. या
दरबारात काही महिला आपल्या समस्या मांडत आहेत. तर
मागील भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, राजमाता जिजाऊ आणि इतर दरबारी यांच्या दृश्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दाखवण्यात आला आहे. तर शेवटच्या भागात किल्ला आणि राजमुद्रांची प्रतिकृती दाखवण्यात आली आहे. चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग दर्शविण्यात आले आहेत.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!