Tue, Apr 21, 2026
अध्यात्म स्थानिक बातम्या

वाईच्या कन्याशाळेत रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

वाईच्या कन्याशाळेत रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedJanuary 20, 2024

वाई: सोमवार 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना च्या दिनाचे औचित्य साधून येथील कन्याशाळेमध्ये विविध उपक्रमांनी या ऐतिहासिक दिवसाचा उत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती प्राचार्या रुक्मिणीताई भोये यांनी दिली.

रोषणाई,झेंडू ची फुले,भगव्या पताकांनी शाळा सजवली गेली आहे.
प्रभू श्रीरामाच्या पोशाखात प्रशालेच्या विद्यार्थिनी काढल्या जाणाऱ्या शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहेत.तसेच या निमित्ताने श्रीरामचंद्रांच्या जीवनातील विविध घटनांचे देखावे सादर करून त्या विषयीची माहिती विद्यार्थीनींना दिली जाईल.

शाळेच्या विद्यार्थिनींचे ढोलपथक शोभायात्रेच्या अग्रभागी असेल.
शाळेतील गीतमंच च्या विद्यार्थिनी व संगीत शिक्षिका वर्षा जोशी यांचा गीत रामायणातील तसेच प्रभू श्रीरामचंद्राच्या वरील विविध गीतांच्या गायनाचा कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केला आहे.
त्या नंतर सामुदायिक रामरक्षा पठण होईल.

अयोध्येत होणाऱ्या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर पाहण्याची सुविधा शाळेतील अद्ययावत अशा सत्यवती जोशी सभागृहात उपलब्ध केली आहे.

तरी आपल्या भारतवर्षाचा दैदिप्यमान इतिहास अनुभवण्यासाठी पालकांनी व विद्यार्थिनींनी सोमवार दिनांक 22 जानेवारी रोजी शाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्या रुक्मिणीताई भोये यांनी केले आहे.

पुढील वर्षी शाळेच्या शताब्दी मुहूर्तावर रामायनावर आधारित विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!