पत्रकार किशोर रोकडे यांना पितृशोक
बदेवाडी, भुईंज येथील ज्येष्ठ नागरिक रामचंद्र सोपान रोकडे (वय 76) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज शनिवारी सायंकाळी 7 वाजता भुईंज येथील कृष्णा नदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रामचंद्र रोकडे यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली, 1 मुलगा, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. वाई तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष किशोर रोकडे यांचे ते वडील होत.













