Thu, Jan 15, 2026
प्रशासन सातारा जिल्हा

अत्यावश्यक सेवेतील एल.पी.जी., डिझेल व पेट्रोल पुरवठा करणा-या वाहनांची व चालकांची अडवणूक केल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

अत्यावश्यक सेवेतील एल.पी.जी., डिझेल व पेट्रोल पुरवठा करणा-या वाहनांची व चालकांची अडवणूक केल्यास कारवाई होणार – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Ashok Ithape
  • PublishedJanuary 12, 2024
सातारा दि. १२ (जिमाका): हिट ॲन्ड रन प्रकरणी जिल्हयात कोठेही वाहनांची अडवणूक केली जात असल्यास त्याची माहीती वाहतुक ड्रायव्हर यांनी पोलीस प्रशासनास तात्काळ दयावी. सदयस्थितीत केंद्र शासनाने हिट ॲन्ड  रन प्रकरणी नवीन कायदयाची अंमलबजावणी सुरू केलेली  नाही. त्यामुळे कोणीही अत्यावश्यक सेवेतील एल.पी.जी., डिझेल व पेट्रोल पुरवठा करणा-या वाहनांची व ड्रायव्हर यांची अडवणूक करू नये. अन्यथा अशी आडवणूक करणा-या संबधितांवर पोलीस विभागाकडून गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येणार येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
केंद्र शासनाने हिट ॲन्ड  रन प्रकरणी नवीन कायदयाची अंमलबजावणी सुरू केलेली नसतानाही काही लोकांकडून या नवीन कायद्याची अंमलबजावणी होवू नये म्हणून आंदोलन सुरू केल्याने  व वाई एम.आय.डी.सी. येथील बी.पी.सी.एल. एल.पी.जी. बॉटलींग प्लाँन्ट परिसरात निदर्शने केल्याची बाब निदर्शनास आल्याने  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करणेत आलेली होती.  सदर बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आर.पी.भुजबळ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण,   एल.पी.जी.भारतचे सेल्स ऑफीसर प्रशांत पटेल,
भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडचे प्रभात कुमार, पेट्रोल पंप चालक संघटनेचे अध्यक्ष रितेश रावखंडे, सातारा जिल्हा पेट्रोल वितरक संघटनेचे अध्यक्ष विपुल शहा आदी उपस्थित होते.
 यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, जिल्हयातील सर्व ट्रान्सपोर्टस व ड्रायव्हर्स यांच्या पाठीशी प्रशासन असून त्यांना जिल्ह्यात कोठेही अडचण आल्यास तात्काळ महसूल व पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!