Thu, Jan 15, 2026
सरपंचनामा

शहाबाग ग्रामपंचायत उपसरपंच पदी किरण कुमार जमदाडे यांची निवड

शहाबाग ग्रामपंचायत उपसरपंच पदी किरण कुमार जमदाडे यांची निवड
Ashok Ithape
  • PublishedDecember 16, 2023

भुईंज / प्रतिनिधी

वाई तालुक्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या शहाबाग ग्रामपंचायत उपसरपंच पदी आज किरण कुमार जमदाडे यांची निवड झाली या निवडीसाठी दोन अर्ज दाखल झाले त्यापैकी राष्ट्रवादीचे सुधीर जमदाडे यांचा 6 /4 मताधिक्याने भाजपचे किरण कुमार जमदाडे यांनी पराभव करून विजय मिळवला.

उपसरपंच निवडीसाठी आज अध्यासी अधिकारी सरपंच श्री सागर जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची बैठक झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून नायब तहसीलदार वैशाली जायगुडे व सर्कल इंगवले उपस्थित होते.

प्रारंभी प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रामसेवक चव्हाण यांनी उपसरपंच निवडीचे कामकाज पाहिले यावेळी उपसरपंच पदासाठी किरण कुमार जमदाडे व सुधीर जमदाडे यांचे दोन अर्ज आल्याने त्यांची हात उंच करून मतदान घेण्यात आले, त्यावेळी किरण कुमार जमदाडे यांना जास्त मतं मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

बैठकीस ग्रामस्थ श्री लालसिंगराव जमदाडे ,अरविंदराव कोरडे, नामदेव राजपुरे, आनंदराव जमदाडे ,अविनाश जमदाडे ,शेखर जमदाडे, अजित जमदाडे ,निलेश जमदाडे ,सुनील जमदाडे ,विकास जमदाडे, गणेश ससाने सर ,शंकर कदम ,अशोक जमदाडे ,नारायण रासकर , चंदू मातारे , घनश्याम लोळे , अरविंद दादा जमदाडे, संजय दाभोळे, प्रीतम जमदाडे तसेच सरपंच सागर जमदाडे ,सदस्य श्री विनय कोरडे, श्री अजिंक्य जमदाडे, सौ रेखा राजापुरे सौ जयश्री दाभोळे उपस्थित होते.

या निवडीबद्दल श्री किरण कुमार जमदाडे यांचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रोहिदास बापू पिसाळ, वाई तालुका अध्यक्ष श्री दीपक दादा ननावरे, जिल्हा कामगार अध्यक्ष श्री तेजस दादा जमदाडे यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

तसेच भाजपचे खासदार श्री श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, माण खटाव चे आमदार जयकुमार भाऊ गोरे, शिवसेनेचे नेते माननीय पुरुषोत्तम जाधव, तसेच लोणंद येथील डॉक्टर नितीन सावंत यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!