Mon, Mar 2, 2026
क्राईम न्यूज

दोन निरनिराळ्या गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल वाई पोलिसांनी हस्तगत करून मूळ मालकास केला परत.

दोन निरनिराळ्या गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल वाई पोलिसांनी हस्तगत करून मूळ मालकास केला परत.
Ashok Ithape
  • PublishedDecember 4, 2023

वाई / प्रतिनिधी, दि. 4 :

वाई पोलीस ठाणे येथे काही दिवसांपूर्वी रामचंद्र पांडुरंग जमदाडे यांची फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास केले होते वाई तपास पथकाने त्यांचे 1,20,000/- रुपये किमतीचे तीन तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.

तसेच शंकर पांडुरंग राजपुरे यांच्या घरात काही दिवसापूर्वी तांब्याची जुनी भांडी तसेच गॅस गॅसची चोरी झाली होती.सदर गुन्हा उघड करून 30,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

दोन्ही घटनेतील मुद्देमाल आज मा. न्यायालयाचे आदेशाने मूळ मालकास परत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सो सातारा श्री समीर शेख, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई बाळासाहेब भालचिम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, बिपिन चव्हाण, पोलीस हवालदार अजित जाधव, भाऊसाहेब धायगुडे, पोलीस अंमलदार प्रसाद दुदुस्कर, गोरख दाभाडे,हेमंत शिंदे श्रावण राठोड,नितीन कदम, प्रेम शिर्के, स्नेहल सोनवणे यांनी केली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!