Thu, Jan 15, 2026
प्रशासन

देहविक्री व्यवसायातील महिलाकरीता बुधवारपेठ येथे मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

देहविक्री व्यवसायातील महिलाकरीता बुधवारपेठ येथे मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedDecember 4, 2023

पुणे, दि.३: विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नथूबाई हकमचंद गुजराथी शाळा बुधवार पेठ येथे देहविक्री व्यवसायातील महिलांकरीता मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अर्चना तांबे, तहसीलदार राधिका बारटक्के, नायब तहसीलदार स्मिता कुलकर्णी, जिल्हा एड्स प्रतिबंधक नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुधीर सरोदे, विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत उपेक्षित घटकांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेऊन मतदान नोंदणी करावी, असे आवाहन श्रीमती तांबे यांनी यावेळी केले.

शिबिरात देहविक्री व्यवसायातील महिलांची मतदार नोंदणीकरीता एकूण ७८ अर्ज भरुन घेण्यात आले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!