Wed, Mar 4, 2026
सातारा जिल्हा सामाजिक

साताऱ्यात मंगळवारी शिवतीर्थ येथे एक दिवा माझ्या राजासाठी

साताऱ्यात मंगळवारी शिवतीर्थ येथे एक दिवा माझ्या राजासाठी
Ashok Ithape
  • PublishedNovember 10, 2023
मंगळवारी, एक दिवा शिवतीर्थावर
राजधानी साताऱ्याचे गर्भगृह म्हणजे शिवतीर्थ !
ऐन दिवाळीत सारा देश झगमगाटात निहारतो आहे तेंव्हा आमचे श्रद्धास्थान शिवतीर्थ ही दिव्यांच्या प्रकाशात हवे म्हणून गेल्या वर्षी पासून आपण एक दिवा माझ्या राजासाठी हा उपक्रम सुरू केला. त्याला सातारकरांनी उदंड प्रतिसाद दिला यंदाही पाडव्याला म्हणजेच मंगळवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता तमाम सातारकरांनी शिवतीर्थ येथे आपल्या कुटुंब व मित्र परीवरासहित प्रत्येक व्यक्तीने एक दिवा घेवून येयचं आणि यावच लागेल.
एकी कडे शिवतीर्थावर समोर असलेली सराफी दुकान, परदेशी कंपनीचे शॉप, हॉटेल ही सगळी दिव्यांनी झगमगली आहेत मग माझा राजा का अंधारात असावा,  त्यासाठी आम्ही ठरवलं आहे आमच्या राजधानीतले छत्रपती शिवराय आपण दिव्यांनी उजळून टाकायचे आहेत, त्यासाठी तमाम सातारकरांनी एकत्र येवून ह्या अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होयचे आहे
आपली आपण जबाबदारी ओळखून आपलं कर्तव्य पार पाडू,
यासाठी मंगळवार 14 नोव्हेंबर संध्याकाळी 6.30 वाजता
प्रत्येक सातरकरांनी एक दिवा शिवतीर्थावर लावण्यासाठी एकसंघ व्हावे !
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!