Wed, Mar 4, 2026
सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यात एक लाख 32 हजार 447 आनंदाचा शिधा वाटप

सातारा जिल्ह्यात एक लाख 32 हजार 447 आनंदाचा शिधा वाटप
Ashok Ithape
  • PublishedNovember 9, 2023

सातारा, दि. 9 :  दिपावली सणानिमित्त सातारा जिल्ह्यात आनंदाचा शिधावाटप सुरु आहे. यामध्ये सातारा जिल्ह्याने आघाडी घेतली असून आत्तापर्यंत 1 लाख 32 हजार 447 आनंदाचा शिधा संच वाटप झाले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली.

वाटप करण्यात आलेल्या संचांची टक्केवारी 33.68 टक्के असून तालुकानिहाय वाटप पुढीलप्रमाणे आहे. खंडाळा 10 हजार 196, कोरेगाव 17 हजार 111, कराड 38 हजार 232, वाई 9 हजार 157, सातारा 22 हजार 567, फलटण 13 हजार 422, जावली 5 हजार 175, महाबळेश्वर 1 हजार 500, माण 5 हजार 124, खटाव 6 हजार 92, पाटण 3 हजार 178.

जिल्ह्यात अजून 2 लाख 60 हजार 795 आनंदाचा शिधा संच वाटप करण्यात येणार आहे. दिपावली पूर्वी हे वाटप पूर्ण करण्याचे पुरवठा विभागाने नियोजन केले असल्याचेही श्रीमती राजमाने यांनी सांगितले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!