Sun, Apr 19, 2026
अभिष्टचिंतन

जननायक आमदार मकरंदआबा पाटील यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन

जननायक आमदार मकरंदआबा पाटील यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन
Ashok Ithape
  • PublishedOctober 29, 2023

वाई, दि. २८  : वाई-खंडाळा- महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार व किसन वीर कारखान्याचे
चेअरमन मकरंदआबा पाटील यांचा रविवार (दि. २९) रोजी वाढदिवस असल्याने मतदार संघामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, किसन वीर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

प्रसिद्धीपत्रकात श्री. शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की, कारखाना कार्यस्थळावर किसन वीर कारखाना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व मिरज येथील सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शेंद्रे-सातारा येथील ऑन्को लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर, रक्तदान, मोफत मोतीबिंदू निदान शिबीर, नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार आहेत. सातारा जिल्हा बँकेमार्फत वाई येथील सोनगिरवाडी विभागीय कार्यालयातील मा. खा. लक्ष्मणराव पाटील सहकार सदन येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये ईसीजी, मधुमेहाचे परिपुर्ण मार्गदर्शन, इन्शुलिन व्यवस्थापन, इन्शुलिन बंक, मधुमेह आहार तज्ञांचा सल्ला, गरोधरपणातील मधुमेहाचे व्यवस्थापन, डायबेटीक फुट क्लिनिक, थॉयरॉड तपासणी, रक्तगट, शुगर टेस्ट होणार आहे. सनी चव्हाण मित्र परिवारातर्फे सिद्धनाथवाडी, वाई येथील अंबिकामाता मंदिरात सकाळी १० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये मोफत नेत्रतपासणी व चष्मे वाटप, रक्तदात्यास आकर्षक भेट, बी. पी., शुगर, मोतिबिंदु शस्त्रक्रियाही अल्पदारात करणार आहेत. तसेच आवश्यक असल्यास ईसीजी काढण्याची सोयही करण्यात आलेली आहे. या शिबीरांचा लाभ वाई व पंचक्रोशीतील लोकांनी घ्यावा, असे आवाहनही संयोजकांमार्फत करण्यात आलेले आहे.

आमदार मकरंदआबा पाटील हे रविवार (दि. २९) सकाळी १०.३० वाजेपर्यंत सातारा येथील निवासस्थानी शुभेच्छांचा स्विकार करणार असून सकाळी ११.३० वा. वाई येथील पोस्ट ऑफिसजवळ श्रीकांत सावंत मित्र परिवाराच्या संकल्पनेतून ‘सन्मान माझ्या नेत्याचा’ या कार्यक्रमातून आमदार मकरंदआबा पाटील यांच्या भव्य भित्तीचित्राचे अनावरण आमदार मकरंदआबा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. तदनंतर दुपारी १२.०० वा. जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालय व सिद्धनाथवाडी येथील अंबिकामाता मंदिरातील महाआरोग्य शिबीरास भेट देणार आहेत. तद्नंतर दुपारी ३.०० वा. किसन वीर कारखाना कार्यस्थळावरील गळीत हंगाम शुभारंभास उपस्थित राहणार असुन या कार्यक्रमास राज्याचे सहकार मंत्री ना. दिलीप वळसे-पाटील यांच्या शुभहस्ते व विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन कार्यक्रमानंतर कारखाना कार्यस्थळावर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा स्विकार करणार असल्याची माहिती श्री. शिंदे यांनी दिलेली आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!