Thu, Jan 15, 2026
सहकार

‘किसन वीर’चा दसऱ्याला बॉयलर प्रदिपन समारंभ

‘किसन वीर’चा दसऱ्याला बॉयलर प्रदिपन समारंभ
Ashok Ithape
  • PublishedOctober 21, 2023

दि. २१ – भुईंज :

येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ च्या गळित हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मंगळवार (दि. २४) दुपारी एक वाजता वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याचे जननायक आमदार व किसन वीर कारखान्याचे चेअरमन मकरंदआबा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चनाताई मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, नुकताच किसन वीर-खंडाळा कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदिपन शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे. किसन वीर व किसन वीर- खंडाळा या दोन्ही कारखान्यावरील तोडणी यंत्रणाही लवकरच कार्यस्थळावर दाखल होणार आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत किसन वीर व किसन वीर-खंडाळा कारखाना सुरू होऊन शेतकऱ्यांचा ऊसही वेळेत तुटणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले आहे.

या बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभास कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!