सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील भागधारकांसाठी 21 ऑक्टोंबरला कार्यशाळा
सातारा, दि.20 (जिमाका): सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या धोरणांची आणि उपक्रमांची माहिती व्हावी म्हणून भागधारकांसाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यतेखाली व जिलहाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि. 21 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात एक दिवसीय कार्यशाळचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उ.सु. दंडगव्हाळ यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत राज्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणा-या सुक्ष्म व लघु व मध्यम उद्योग क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करुन रोजगार स्वयंरोजगार संधी मोठया प्रमाणात निर्माण करण्यासाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरिता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभाग त्यांचे उपक्रम व योजना संचालनालयामार्फत राज्यात राबवत आहेत. सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध व्हावे या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत विविध बँकांचे व्यवस्थापक, प्रतिनिधी, आयात व निर्यात क्षेत्रातील अनुभवी प्रवक्ते मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेसाठी सुक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम घटक. निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उत्पादक केंद्र व राज्य शासनाचे तसेच संबंधित उपक्रमाचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य निर्यात संबंधी कामकाज करणारे घटक यांनी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी महाव्यवस्थापक, जिल्हा उदयोग केंद्र, प्लॉट नं. ए-13, जुनी एमआयडीसी, सातारा, जि. सातारा दुरध्वनी क्रमांक 02562-244655, ई-मेल आयडी didic.satara@maharashtra.gov.in येथे संपर्क करावा, असे अवाहनही श्री. दंडगव्हाळ यांनी केले आहे.













