भुईंजमध्ये पंचायत समिती वाई व ग्रामपंचायतीच्यावतीने महाश्रमदान मोहिम
![]()
कचरामुक्त गाव काळाची गरज – श्री. ज्ञानेश्वर खिल्लारी
भुईंज / प्रतिनिधी : १८ सप्टेंबर
स्वच्छता ही सेवा या अभियांनांतर्गत कचरा मुक्त भारत अभियान 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून स्वच्छता ही सेवा उपक्रम संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. हा उपक्रम जनअंदोलनात परिवर्तन होण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक व्यक्तिने रोज स्वच्छतेचे काम केले पाहिजे. ही या पाठीमागची भूमिका आहे. सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती वाई व भुईंज ग्रामपंचायत यांच्यावतीने गावामध्ये महाश्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले होते.
गावातील ग्रामस्थ, गावातील पदाधिकारी, युवक, तालुका स्तरावरील अधिकारी,कर्मचारी जिल्हा परिषद शाळा, महा विदयालयतील मुले-मुली मोठ्या संख्येने मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. यावेळी गावातील सर्व शासकीय कार्यालये , बाजारस्थळ, बस स्थानक, महामार्ग परिसर, गाव परिसर, नदीचा घाटचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
श्रमदान नंतर बोलताना श्री.खिल्लारी यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी व संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी, दुकानदारांनी आपल्या घरातील व दुकानातील ओला – सुका कचरा वेगळा करुन तो ग्रामपंचायतीच्या घंटागाडीमध्ये दयावा व इतरत्र सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येऊ नये, तो कचरा नदी ओढयामध्ये मिसळु नये याकरीता, याची दक्षता घेण्यात यावी. ग्रामपंचायत मार्फत प्लॅस्टिक कचरा वेगळा गोळा करण्यात यावा. यामुळे ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळु शकते, तसेच तालुका स्तरावर प्लॅस्टीक संकलन केंद्र उभारण्यात येणार असुन, त्यामध्ये प्लॅस्टीकची योग्य प्रकारे विल्हेवाट करण्यात येणार आहे.
तसेच उत्सव सण हे पर्यावरण पुरक साजरी करण्यात यावे. त्यामुळे नदीनाले व पाण्याचे स्त्रोत दुषीत होणार नाही यासाठी उपाय योजना करण्यात यावी. यावेळी गटविकास अधिकारी श्री.नारायण घोलप यांनी अभियान कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असुन घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प सर्व गावांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात येणार असुन, कचरामुक्त गाव करण्या करीता नागरीकांनी योगदान दयावे असे सांगण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेमध्ये सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ज्ञानेश्वर खिल्लारी, गटविकास अधिकारी श्री. नारायण घोलप, पोलिस निरीक्षक श्री. जाधव , सरपंच श्री. विजय वेळे, उपसरपंच शुभम पवार ग्रामपंचायत सदस्य- ईशान भोसले, नारायण नलवडे, चेतन दाभाडे, अमित लोखंडे गटशिक्षण अधिकारी श्री.सुधीर महामुनी, उपअभियांता ग्रा.पा.पु.श्री.सुनिल मेटकरी, उपअभियंता बांधकाम श्री.संजय जाधव, विस्तार अधिकारी श्री. रुपेश मोरे, श्री.राहुल हजारे तालुका समन्वयक पाणी स्वच्छता रोहित जाधव, मनोज खेडकर, स्वाती जाधव ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कोचळ यासह शाळेचे शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शालेय विदयार्थी, विदयार्थीनी ग्रामस्थ उपस्थित होते.













