Mon, Mar 2, 2026
Recipe स्थानिक बातम्या

वाई येथील मिलन प्युअर व्हेज मध्ये श्रावण महोत्सवाचा प्रारंभ

वाई येथील मिलन प्युअर व्हेज मध्ये श्रावण महोत्सवाचा प्रारंभ
Ashok Ithape
  • PublishedSeptember 10, 2023

वाई, दि.१० : विठ्ठल माने

खाद्यसंस्कृतीत जुन्या चवींना जबाबदारीने जपत,प्रयत्न व कृतिशीलतेने, उत्तम दर्जा व ग्राहक सेवेद्वारे खवय्यांना तृप्ती व आनंद देणारे मिलन व्हेज रेस्टॉरंट आहे,असे मत ओम दत्त चैतन्य अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष रतनसिंह शिंदे यांनी व्यक्त केले.

येथील मिलन प्युअर व्हेज मध्ये श्रावण महोत्सवाचा प्रारंभ करताना ते बोलत होते. ओम दत्त चैतन्य अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अजित वनारसे, दत्तात्रय पवार पत्रकार दत्ता मर्ढेकर,वाई अर्बन बँकेचे संचालक अशोक लोखंडे,रामचंद्र पवार, सुदीप इंगळे, महादेव भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री.शिंदे म्हणाले, व्यवसायात नवनवीन प्रतिस्पर्धी दाखल होत असूनही महाबळेश्वरला येणारा, परराज्यातील ग्राहक विश्वासाने येथे येतो. येथील अन्नपदार्थांचा दर्जा याच्या मुळाशी आहे. अनेक कुटुंबांचे हे फॅमिली रेस्टॉरंट आहे.

ॲड.अभय मोरे यांनी प्रास्ताविक केले.
अशोक मोरे,अभय मोरे,सोमनाथ मोरे,विजय मोरे,सौ.पूजा मोरे,रवींद्र मोरे यांनी स्वागत केले. विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. अजित मोरे यांनी आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!