Fri, Apr 17, 2026
शिक्षण सहकार सातारा जिल्हा

शिक्षक बँक वार्षिक सभते विरोधकांचा बार फुसका

शिक्षक बँक वार्षिक सभते विरोधकांचा बार फुसका
Ashok Ithape
  • PublishedSeptember 14, 2023

सत्ताधाऱ्यांचाच वरचष्मा ; विरोधी काही सभासद चक्क मद्यधुंद अवस्थेत.

सातारा / प्रतिनिधी :

सातारा येथील प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक
सभेत गोंधळ घालण्याचा विरोधकांचा बार फुसका ठरला.व पाच मिनिटांत उरकली जाणारी वार्षिक सभा अर्धा-पाऊण तास चालली. शिक्षक नेते बलवंत पाटील, उदय शिंदे यांनी सभेनंतरच्या सभासद परिवर्तन पॅनेलच्या प्रतिसभेत मार्गदर्शन केले. तसेच सभा उधळून लावण्याच्या उद्देशाने काही विरोधी सभासद चक्क मद्यप्राशन करून सभागृहात आल्याचा आरोप चेअरमन राजेंद्र बोराटे यांनी केला. मात्र एकंदरीत शिक्षक बँकेच्या रविवारी (दि.१०) झालेल्या वार्षिक सभेवर सत्ताधाऱ्यांचाच वरचष्मा असल्याचे स्पष्ट झाले

प्राथमिक शिक्षक बँकेची 76 वी वार्षिक सर्वसाधारण सभा वाढे फाटा येथील साईदत्त मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बँकेची वार्षिक सभा दरवर्षी गोंधळाच्या वातावरणातच अवघ्या काही मिनिटातच व्हायची. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी सभासद परिवर्तन पॅनेल तर्फे या सभेची जोरदार तयारी करण्यात आली होती. बळवंत फौंडेशनच्या कार्यालयात ज्येष्ठ नेते संभाजीराव थोरात, बळवंत पाटील, बँकेचे चेअरमन राजेंद्र बोराटे व संचालकांची पूर्वतयारी बैठक झाली होती. तर सत्ताधारी गटातील समितीच्या संचालकांची बैठक राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी घेतली. विरोधी गटाचे नेतृत्त्व करणाऱ्या सिध्देश्वर पुस्तके यांनीही त्यांच्या प्रमुख समर्थकांची बैठक बँक फेडरेशनच्या सभागृहात घेतली होती.

सर्व गटांनी केलेल्या जोरदार तयारीच्या पार्श्वभूमीवर ही वार्षिक सभा पार पडकी. दुपारी एक वाजता सभेला सुरुवात झाली. त्यावेळी सत्ताधारी पॅनेलच्या विजयाच्या गारेदार घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पुस्तके गटाचे कार्यकर्ते सभास्थानी हजर झाले. त्यांनी लाभांश व इतर मुझे घेवून घोषणाबाजी केली.

परंतु ‘परिवर्तन’च्या घोषणांमध्ये त्यांचा आवाज विरून गेला. सभा सुरू असतानाच विरोधी संचालक महेंद्र जानुगडे यांनी माईकचा ताबा घेत प्रत्यक्ष विषयाला स्पर्श न करताच वार्षिक अहवाल मागील संचालकांचे फोटो का छापले नाहीत? अशी तक्रार केली. त्यावर त्यांच्याच पुस्तके गटाचे काही कार्यकर्ते नाराज झाले. परंतु सत्ताधाऱ्यांच्या रेट्यापुढे जानुगडे यांचे काहीच चालले नाही. विषय पत्रिकेवरील सर्व विषय बहुमताने मंजूर करण्याम आले. ही सभा सुमारे अर्धा तास चालली.

त्यानंतर सभासद परिवर्तन पॅनोचे प्रमुख बलवंत पाटील, उद‌य शंदे यांनी त्याच व्यासपीठावर पॅनलची प्रतिसभा घेतली. त्यावेळी दोघांनीही बँकेची आजची स्थिती व लाभांश, नफा कमी होण्याची परिस्थिती आणण्यास पूर्वीचे सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप केला. यावेळी शिक्षक संघ, शिक्षक समिती युतीच्या व पाठिंबा दिलेल्या सर्वांसह सभासद परिवर्तन पॅनेलचे गुरुजन सभासद मोठया संखेने उपस्थित होते.

वाघ आला रे…वाघ आला बलवंत पाटील वाघ आला

वार्षिक सभेत विरोधकांनी काही बॅनर नाचवले व घोषणा देण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर देण्यासाठी सत्ताधारी समर्थकांनीही जोरदार घोषणाबाजी केली. ‘कोण आला रे, कोण आला, बलवंत पाटील वाघ आला’ अशा घोषणांनी सभागृह दुमदूमून गेले.

सभा गुंडाळणे भाग पडावे म्हणून विरोधकांनी मोठी
तयारी केली होती. परंतु त्यांचा फारसा प्रभाव जाणवला नाही. सभा संपल्यावर चेअरमन राजेंद्र बोराटे यांनी विरोधक पळपुटे असल्याची खिल्ली उखळी. तसेच विरोधी काही सभासद गोंधळ घालण्याच्या उद्देशाने दारू पिवून आल्याची टिकाही केली. त्यावर पोलीसांनी मद्यधुंद सभासद शोधण्यास सुरुवात केली, तेव्हा संबंधीतांनी सभागृहातून काढता पाय घेतली. अगोदरच कमी संख्या असलेले समर्थक विरळ झाल्याने सिध्देश्वर पुस्तके यांनीही सभागृहातून निघून जाणे पसंत कोले.

या सभोग संपूर्ण जिल्यातून सभासद परिवर्तन पॅनचे सदस्य उपस्थित होतो. कोणतेही गालबोट न लागता सभा यशस्वीपणे पार पाडण्यास केलेल्या सहकार्याबद्दल माजी चेअरमन बलवंत पाटील यांनी उपस्थित अल्प विरोधकांचे उपरोधिक शब्दात आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!