चिंधवलीच्या पवार बंधूंनी सातारा हिल हाफ मॅरेथॉन मधून तरुणांना दिली नवी प्रेरणा
![]()
तरुणांना सहभागी होण्याचे केले आवाहन…
चिंधवली ता.वाई येथील पवारांच आणि मातीच नातं तस पहायला गेल तर नवीन नाही, पण ही मातीशी जुळलेली नाळ कधीच गप्प बसून देणारी नाही, शेतकरी कुटुंबातील हे पवार घराणे नेहमीच शेतीला प्राधान्य देऊन नवनवीन उत्पन्नाचे मार्ग उभे करित राहिले, शेती, माती, आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय या गोष्टी बरोबर शरीर संपन्नतेची खरी गरज ओळखून मातीशी नात आणखी घट्ट करायचे असेल तर तालमीतल्या मातीशीही नातं घट्ट करायलाच हवे आणि त्याच जोरावर या पवार कुटुंबांने पैलवान पवार म्हणून महाराष्ट्राभर नाव कमवले आणि याच पवार बंधूनी साताराची हिल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन तितक्याच उत्साहाने पूर्ण करून तरुणांना प्रेरणा दिली…
श्री रमेश पवार(दादा) माणूस तसा साधा, पण मनी ध्यास नाविन्यपूर्णतेचा, सतत काही ना काही कल्पनेच्या जोरावर नवनवीन गोष्टी वास्तवात उतरवणारा ध्येयवेडा माणूस..शेती ही रक्तातच पण तिथेही या माणसाला नवनिर्मितीचा ध्यास…आणि त्यातूनही हा माणूस दररोज सकाळी न चुकता शाहू स्टेडियमला दर्शन देणारच आणि त्याच जोरावर सातारा मॅरेथॉन बरोबर लेह मॅरेथॉनची खडतर वाट पार करून शेकडो गडकिल्ल्यांच्या वाटा पार करण्याबरोबरच त्यातून अनेकांना गडकिल्ल्यांची ओळख करून या माणसाने अनेक नवनवीन दाखले दिले आहेत..
सौ. कल्पना रमेश पवार (वहिनी) रमेश दादांच्या यशस्वी वाटचालीत सावली सारखी साथ देणाऱ्या वहिनी या मॅरेथॉनमध्ये तितक्याच उत्साहाने दरवर्षी सहभागी होत असतात आणि यशस्वीरीत्या स्पर्धा पूर्ण करत असतात.
पै जयवंत (आबा) पवार तस पहायला गेले तर आबांच आणि तालमीच नातं जवळचच…पण विचांराची बोलकी भाषा गोड आणि त्यात माणुसकीचा झरा असल्याने पैलवान कुटुंबाचे नाव आणखी पुढे नेऊन पवारांनी स्वतःची एक चांगली ओळख निर्माण केली,
तिरंगा एज्युकेशन सोसायटी, तिरंगा इंग्लिश स्कूल, जयहो स्पोर्ट्स क्लब, राजेश स्वामी साहेब अभ्यासिका या शैक्षणिक वाटचालीतून अनेकांना यशस्वी होण्यासाठी घेतलेले कष्ट.
प्रत्येक टप्प्यावर अनेकांच्या जडणघडणीला हातभार लावण्याबरोबर शैक्षणिक, सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आणि त्याचजोरावर आबांनी आजही त्याच उत्साहाने सातारा मॅरेथॉन पूर्ण करून तरुणांपुढे नवा आदर्श ठेवला…
श्री सत्यविजय पवार (तात्या) इंजिनिअर असणारं व्यक्तिमत्व…पण विचारांची वाटचाल नेहमीच दूरदृष्टी ठेवून पुढे जात आहेत,
वाडवडिलांकडून मिळालेले सुसंस्कृत संस्कार.. परिस्थितीचे चटके..माणुसकीची शिकवण..याच जाणीवेतून जनमाणसातली माणुसकीची नाळ आजही जोडण्यासाठी एक पाऊलं पुढे सरसावणारं व्यक्तिमत्त्व म्हणून सत्यविजयतात्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलीय…
तरुण पिढी शिकली पाहिजे, चांगल्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे.. घासातला घास देण्याची जाणीव झाली पाहिजे हि भुमिका ते स्वतः निस्वार्थीपणे निभावत आहेत..
गरजवंताला गरजेची भूक ओळखून त्या त्या टप्यावर अनेकांना सहकार्यासाठी हात पुढे केला आहे..गावं, शहरं, राज्य फिरूनही जेव्हा हा माणूस पुन्हा गावात पाय ठेवतो तेव्हा या माणसाच्या चेहऱ्यावर दुनिया फिरून आलेला साधा लवलेशही नसतो तर समोर येणारा परका आहे का आपला हे न बघता त्याला माणुसकीतून नमस्कार…कारण रक्तातच नाही तुझमाझ करायच…फक्त सगळ्यांना बरोबर घेऊन चालण एवढचं डोक्यात..
नोकरीच्या व्यस्त वेळापत्रकातून घरच्या शेतीवाडीतली मदत असूदे की, जणमानसातली सुखदुःख असूदे, समाजकार्य असूदे, बालचिमुकल्यांचा शैक्षणिक खर्च असूदे, पंढरीची वारी असूदे, गडेकोट मोहीम असूदे, की हिमालय असूदे हा माणूस त्या त्या टप्प्यावर हजेरी लावून माणुसकीचे दर्शन घडवतोय…आणि त्याच जोरावर त्यांनी सातारा मॅरेथॉन अगदी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.
श्री प्रकाश पवार (नाना) वाई येथील उत्कर्ष पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक, अगदी पदाला साजेशी कामगिरी करणारी ही त्यांची ओळख.
त्याच बरोबर गडकिल्ल्यांच्या सहवासात झोपेतून उठून जायचं म्हटलं तर तितक्याच उत्साहाने आणि आनंददायी भावनेतून एक पाऊल पुढे टाकून मार्गस्थ आणि त्याची महती तितक्याच पोटतिडकीने सर्वांना सांगत येणाऱ्या पिढीला तितक्याच उत्साहाने पुढे येण्यासाठी प्रयत्न…
इतिहासाच्या पाऊलखुणा पुन्हा पुन्हा रुजल्या जाव्यात, वाढल्या जाव्यात म्हणून भावी पिढीला योग्य संकल्पनेतून गडकिल्ल्यांच्या सहवासात प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या योजना प्रत्यक्षात साकारण्यासाठी नेहमीच धडपड…
सौ, वनिता जयवंत पवार (वहिनी), कल्पेश पवार, गिरिराज पवार, अजय पवार, विवेक पवार, सिद्धेश पवार, प्रितम पवार, प्रथमेश पवार यांचाही नेहमीच या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग असतो.
दिपक पवार, चिंधवली
३ सप्टेंबर २०२३













