Fri, Apr 17, 2026
संपादकीय

पोलिस भगिनी झाल्या मैय्या यशोदा

पोलिस भगिनी झाल्या मैय्या यशोदा
Ashok Ithape
  • PublishedSeptember 3, 2023

भुईंज गावात परवा अत्यंत दुर्दैवी घटना घडली. सासूच्या छळाला कंटाळुन सुनेने आत्महत्या केली. वास्तविक सासूचे गाव भुईंज नव्हे. असो, मुली, लेकी व सुनांच्या बाबतीत अशा पध्द्तीच्या चुकीच्या वागणुकीने उतावड्या, बाहेरच्या लोकांनी भुईंजचे नाव बदनाम करण्याची जणू सुपारी घेतलीय.

तर झाले काय, पायल वाघ या अवघ्या 25 वर्षांच्या सासुरवाशीण पोरीने आत्महत्या केली. त्याने 2 वर्षाचे लेकरू वाऱ्यावर पडले. त्या लेकराला आधार दिला तो भुईंज पोलीस महिला आणि तेजस्वी दळवी यांनी.

पायल वाघ गेली.. की तिला जायला, आत्महत्येला भाग पाडले?
ते काही असो, त्याने दोन वर्षांचा कान्हा मायेच्या सावलीला पारखा झाला हे सत्य.

या घटनेने पोरक्या झालेल्या या चिमुरड्याला एक दिवस पोलीस भगिनींनी नंतर एक दिवस आमच्या दशरथ काकांच्या लेकीने म्हणजेच तेजस्वीने व पुन्हा आज पोलीस भगिनींनी सांभाळले.

उद्या या लेकराची रवानगी अनाथाश्रमात होईल

ती योग्य व चांगल्या ठिकाणी व्हावी यासाठी Api रमेश गर्जे प्रयत्न करत आहेत.

या बाळाला सांभाळण्यासाठी माझी पत्नी प्रबोधिनी, तसेच आमचा कुणाल किंवा नितीन भोसले व इतर काही तयार असले तरी कायदा त्याला मान्यता देत नाही

त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया होऊन हा पोर आता अनाथाश्रमात जाईल

यासाठी रमेश गर्जे यांचे प्रयत्न कमी येतील, ते प्रयत्न चांगले अनाथाश्रम मिळवून देईल

पण यात या लेकराचा दोष काय?

या कान्हाची जबाबदारी आता त्याचा मामा घेत असल्याचे आता हे लिहताना समजले

तसे असेल तर चांगलेच, अनाथाचे जीवन त्याच्या वाट्यास येणार नाही

पण विना आई बापाच्या लेकराला नातेवाईकाच्या घरी देखील अनाथाचे जीवन वाट्याला येणार नाही याची काय गॅरंटी?

या दरम्यान भुईंज पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार माझी वर्गमैत्रिन गीतांजली ननावरे व इतर महिला पोलीस भगिनींनी या कान्हाची आज जबाबदारी घेतली.

एक सांगू?

गीता व या साऱ्या ढसाढसा रडल्यात आज. का? तर एवढया चिमुरड्या जीवाला वनवास लाभला म्हणून.

एका अनुभवी पोलीस  कर्मचाऱ्याने त्यांना ऐकवले पण, तुम्ही महिला असला तरी पोलिस आहात, भावनिक होणे शोभत नाही तुम्हाला.

पण एक सांगू का?
या सर्व परिस्थितीने गुन्हे इनविस्टीगेशन मधील बाप असणारा api रमेश गर्जे हे पण हेलावले तिथ या माय मावल्या पोलीस कर्मचारी भगिनींची काय कथा?

हा सर्व प्रकार काळीज पिळवटून टाकणारा, या सर्व बिकट काळात अनाथ झालेल्या कान्हाचे पालकत्व स्वीकारलेल्या पूनम, api रमेश गर्ज व पोलीस दलाला सलाम.

राहुल तांबोळी, भुईंज

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!