सैनिकी मुलां, मुलींचे वसतिगृह पुणे येथे कंत्राटी पद्धतीने अशासकीय पदभरती
पुणे, दि. १८: पुणे शहरातील पर्वती आणि नवी पेठ येथील सैनिकी मुलां/मुलींच्या वसतिगृहात प्रत्येकी एक पहारेकरी व माळी अशी दोन्ही ठिकाणची ४ अशासकीय पदे २९ ऑगस्ट रोजी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरावयाची आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना पहारेकरी पदासाठी १९ हजार ९४३ तर माळी पदासाठी १२ हजार १२७ रूपये मानधन देण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र माजी सैनिक, विधवा पत्नी व इतर नागरीक यांनी २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत आपले अर्ज संबंधित वसतिगृहामध्ये सादर करावेत.
अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक शेख अब्दल- भ्रमणध्वनी क्रमांक ७०२०४१०९५४ व वसतिगृह अधीक्षिका एम. व्ही. कांबळे- भ्रमणध्वनी क्रमांक ९५१८३७४८६३ वर उमेदवारांनी संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे (निवृत्त) स. दे. यांनी केले आहे.













