सेल टॅक्स ऑफिसर अमोल गोरे यांच्याकडून आझाद मोफत वाचनालयाचे IFS राजेश स्वामी ग्रंथालयात समृद्धीची भर
सेतू माधवराव पगडी यांची प्रचंड गाजलेली आणि ज्ञानात भर टाकणारी, श्रीकांत बोजेवार यांची लहान मुलांसाठीची डिटेक्टिव्ह स्टोरीजची, ग्रामीण शैलीची खुमासदार, खदखदून हसवणारी प्रसिद्ध लेखक शंकर पाटील यांची सर्वच्या सर्व २१ पुस्तकांसोबत ७ हजारांची एकूण ३७ पुस्तके विक्री कर अधिकारी अमोल गोरे यांनी आज भुईंज ग्रामपंचायतीच्या ‘आझाद मोफत वाचनालयाचे IFS राजेश स्वामी ग्रंथालय’ ला भेट देण्यासाठी खरेदी केली. यात खुलुस आहे आणि जागतिक पातळीवर गाजलेल्या विश्वव्यापी इंग्रजी कादंबऱ्यांची मराठी अनुवादित पुस्तकेही आहेत.
अमोल गोरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतुन वाटचाल करत, अडचणींचा पहाड प्रचंड इच्छाशक्तीने फोडून काढत MPSC द्वारे स्वतःला सिद्ध करत आजचे स्थान प्राप्त केले आहे.
अमोलचा स्वतःचा जीवनप्रवास एखाद्या कादंबरीचा विषय तर आहेच शिवाय तो तमाम युवकांसाठी देखील प्रेरणादायी ठरावा असाच आहे.
विशेष काय? तर स्वतः हालअपेष्टा सोसूनही मनात कटुता नाही. ना व्यवस्थेबद्दल ना परिस्थितीबद्दल.
म्हणूनच हे दान त्याने दिले ते सत्पात्री ठरावे ही कळकळीची अपेक्षा विनंती. वास्तविक त्याने मागेही या ग्रंथालयास पुस्तके भेट दिलीत. त्यात भर टाकत त्याने पुन्हा एकदा दाखवलेले हे औदार्य अभिनंदनीय.
या ग्रंथालयाला अशा पद्धतीने सुमारे दोनेक लाखांची पुस्तके भेट मिळवली आहेत. त्यास अनेकांचा हातभार लागला आहे.
अमोलसह अनेकजण या ग्रामपंचायतीबाबत, या वाचनालयाप्रती जपत असलेली ही भावना आदरयुक्त. त्याला कोणी तडा जाऊ देता कामा नये.
सेल टॅक्स ऑफिसर अमोल गोरे यांचे अभिनंदन आणि या समृद्ध ग्रंथसंपदेचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती.
राहुल तांबोळी, भुईंज













