Mon, Mar 2, 2026
Uncategorized

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप सोहळा व 77 वा स्वातंत्र्य दिन कन्याशाळेत उत्साहात साजरा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप सोहळा व 77 वा स्वातंत्र्य दिन कन्याशाळेत उत्साहात साजरा
Ashok Ithape
  • PublishedAugust 15, 2023

वाई / प्रतिनिधी :

वाई येथील शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या कन्याशाळेमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप सोहळा दिनांक 9 ऑगस्ट 2023 पासून 14 ऑगस्ट 2023 पर्यंत विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीने साजरा करण्यात आला.

तसेच 77 व्या स्वातंत्र्यदिनी वीरपिता श्री भास्करराव व वीरमाता सौ रजनी अभ्यंकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
दिनांक 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या दरम्यान विविध गटांसाठी “मेरी माटी मेरा देश” ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप सोहळा निमित्ताने वीर जवानांच्या बलिदानाची जाणीव ठेवून रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंचप्राण प्रतिज्ञा, वृक्षारोपण या कार्यक्रमांबरोबरच स्थानिक वीर शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा कन्याशाळा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

15 ऑगस्ट च्या मुख्य कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून
हवाईदलामध्ये अनेक वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले 85 वर्षांचे श्री भास्करराव अभ्यंकर सौ रजनी अभ्यंकर या वीरपिता व वीरमाता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

श्री भास्करराव अभ्यंकर यांचे हवाई दलामध्ये कार्यरत असणारे सुपुत्र रवीकर यांना 2013 या वर्षी भारतमातेच्या रक्षणार्थ कर्तव्य बजावताना वीरमरण आले.यावेळी त्यांच्या हवाईदलातील कर्तृत्वाचा आढावा घेऊन त्यांच्या देशभक्तीला व साहसाला विनम्र अभिवादन करण्यात आले.

श्री अभ्यंकर यांनी 1958 गोवा मुक्ती स्वातंत्र्यलढा,1962 चीन युद्ध,1965 पाकिस्तान युद्ध ,1993 कारगिल युद्धाच्या पूर्वतयारीत सहभाग घेतलेला होता.

स्वातंत्र्यदिनाच्या उल्हसित प्रसंगी शाळेतील क्रीडाशिक्षकांच्या मार्गदर्शनाने आर.एस.पी च्या विद्यार्थिनींनी संचलन व मानवंदना दिली. हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी शाळेतील विद्यार्थिनींचे पालक,परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्ताचे निमित्त साधून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कर्वेनगर पुणे यांच्यावतीने चालवण्यात येत असलेल्या संपदा बेकरीच्या वाई शाखेचे उद्घाटन करण्यात आले.

संपदा बेकरीमध्ये उत्तम स्वादिष्ट पदार्थ विद्यार्थिनी ‘कमवा शिका’ योजनेअंतर्गत स्वतः बनवतात. वाई मध्ये ही सुविधा उपलब्ध केल्याबद्दल संस्थेचे संचालक आणि कन्याशाळा वाई शाळा समिती अध्यक्ष ॲड.श्री प्रभाकर सोनपाटकी यांनी आनंद व्यक्त केला.

दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान शाळेमध्ये झालेल्या विविध कार्यक्रमासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था कर्वेनगर पुणे परिवारातील संचालक ॲड अभय कुलकर्णी,उपसचिव श्री प्रदीप वाजे,संपदा बेकरीचे व्यवस्थापक श्री गिरीश कुमठेकर, स्थानिक शाळा समिती सदस्य श्री रमेश कोरडे,सौ अंजली काणे,सौ रश्मी शेवडे ,श्री अविनाश जोशी, सुनिल शिंदे,यासह कन्याशाळा वाई च्या मुख्याध्यापिका सौ रुक्मिणीताई भोये, पर्यवेक्षिका सुचिता पवार, आजन्मसेविका सौ.राव,तसेच कन्या शाळा परिसरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक,पालक यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी शाळेतील कार्यक्षम सेवक वर्गाचा उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ध्वजारोहणामध्ये केलेल्या पथसंचलनाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!