रानभाजी महोत्सवाचे 14 ऑगस्ट रोजी आयोजन, नागरिकांनी लाभ घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन
सातारा.दि.11 (जि.मा.का) : जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व कृषि तंत्रज्ञान व्यवसथापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने गोडोली नाका, सातारा येथील हॉटेल लेक व्ह्यिु येथे दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आत्माच्या प्रकल्प संचालकांनी दिली आहे.
या रानभाजी महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्यांची माहिती प्रचार व प्रसिद्वी, प्रदर्शन तसेच जिल्हयातील शेतकऱ्यांकडे उपलब्ध असणाऱ्या रानभाज्या शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांपर्यंत विक्री करण्यात येणार आहे.
रानभाजी महोत्सवामध्ये रानभाजी विक्री करणेसाठी जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा सातारा यांनी केले आहे.













