हाडवैद्यकीतील मानाचा कणा सचिन वरखडे
![]()
वेदनामुक्तीचा आनंद हाच आपल्यासाठी खरा पुरस्कार आहे, असे सांगणारे सचिन वरखडे खऱ्या अर्थाने जमिनीवर पाय असणारे आणि अनेकांसाठी आदर्श ठरणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे.
दैनंदिन व्यवहारात अनेकदा काही चूकांमुळे किंवा घात अपघातांमुळे कधी वयामुळे हाडांची मोडतोड किंवा झीज होत असते, मात्र मोडलेली किंवा सरकलेली हाडे योग्य कौशल्याने पूर्ववत करण्याचे कसब वाई तालुक्यातील वरखडवाडी गावच्या वरखडे हाडवैद्य यांनी प्राप्त केले आहे. वरखडे परिवारातील नव्या पिढीचे प्रतिनिधी समीर उर्फ सचिन हरिभाऊ वरखडे यांनी ही कला अवगत केली असून कृष्णाकाठच्या वरखडवाडी या छोट्याशा गावातून नवी मुंबईतील कोपरखैरणेच्या प्रशस्त उपचार केंद्रापर्यंत विस्तारित केली आहे.
सन 2001 पासून हाडवैद्य म्हणून सेवा बजावताना गेल्या 23 वर्षांत त्यांनी लाखो रुग्णांना वेदनामुक्त केले आहे. वास्तविक वरखडवाडी या गावाला हाडवैद्यकीची जुनी परंपरा आहे. या पिढीजात कौशल्याच्या माध्यमातून वरखडे परिवारातील अनेकांनी “हाडवैद्यांचे गाव” म्हणून ओळख निर्माण केली आहे. सचिन यांचे वडील हरिभाऊ रावजी वरखडे आणि बंधू किसन वरखडे यांनी मानवी शरीरातील विविध अवयव हाडे व सांध्यांचा सखोल अभ्यास केला. हाडाची रचना व त्याचे शरीरातील स्थान याबाबत त्यांचे स्वतःचे काही ठोकटाळे होते. या अभ्यासाच्या माध्यमातून मोडलेले, मुरगळलेले व निसटलेले हाड सरळ व नीट करण्याचे. कौशल्य त्यांनी साध्य केले आहे.
साधारण 1960 पासून वरखडे कुटुंब मुंबईत हाडवैद्यकीच्या क्षेत्रात कार्यरत होते. ‘गवयाचे मूल रडतानाही सुरातच रडते’ अगदी त्या म्हणीप्रमाणेच वेदनामुक्तीचे आणि हाड बसवण्याचे प्रयोग लहानपणापासून पाहतच सचिन यांचीही जडणघडण झाली.सन 1994 पासून सचिन यांनी बंधू किसन वरखडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ज्ञान प्राप्त केले.व या कलेत पारंगत झाले.
सन 2001 मध्ये नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सचिन वरखडे यांनी हाडवैद्य म्हणून कामकाज सुरू केले. आजवर मान, पाठ आणि गुडघेदुखी या विकारांशी संबंधित लाखो रुग्णांवर त्यांनी उपचार केले आहेत. पाठ, मान, गुडघा, हात- पाय आदी अस्थिरोगांवर तज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेले उपचार वेदना मुक्तीचा मूलमंत्रच ठरला आहे.
कोणतीही महागडी औषधे न देता केवळ आपल्या हाताच्या उपचाराने हाडांचे फ्रॅक्चर मुरगळणे, चमकणे ,मोडणे यावर योग्य तो तोडगा काढणारे सचिन वरखडे हे अस्थी उपचारातील जादूगारच आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अगदी माफक खर्चात रुग्णांना वेदना मुक्त करण्याचे कसब सचिन वरखडे यांच्याकडे आहे.
यासोबतच सचिन वरखडे यांनी त्यांच्या परिवारातील अन्य सात सदस्यांनाही हि कला शिकवली असून या कलेत तरबेज केले आहे. मनोज जाधव, नितीन शेलार, दत्ता वरखडे , निखिल वरखडे ,किरण वरखडे ,तेजस मोरे आणि किरण मोरे हे सातही जण सचिन यांच्या खांद्याला खांदा लावून हे कार्य अविरतपणे करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या ठिकठिकाणच्या अस्थि रुग्णांना बरे करण्यासाठी आपले कौशल्य पणाला लावत असतात.
सातारा जिल्ह्यातील निसर्गसंपन्न वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील वरखडवाडी या छोटेखानी गावातून हाडवैद्यकीच्या रूपाने एक प्रकारे संजीवनी घेऊनच वरखडे कुटुंबीय संपूर्ण महाराष्ट्रासाठी वरदान ठरले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, ठाणे, मुंबई आदी जिल्ह्यांबरोबरच परराज्यातूनही उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण कोपरखैरणे येथे येत असतात. दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, मद्रास, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आदी राज्यातही वरखडे यांच्या हाडवैद्य कौशल्याची ख्याती पसरली आहे. इतकेच काय पण उत्तम गुण आल्याने मोठ्या प्रमाणावर ‘माऊथ पब्लिसिटी’ झाल्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, दुबई, कुवेत आदी परराष्ट्रांतूनही उपचारासाठी कोपरखैरणे येथे रुग्ण आल्याची अनेक उदाहरणे आहेत.
वास्तविक नवी मुंबईत असलेले सचिन वरखडे हाडवैद्य म्हणजे हाडाच्या समस्या उद्भवलेल्या रुग्णांसाठी संजीवनी केंद्रच आहे. “फरक पडतो, आराम मिळतो आणि निश्चितता लाभते” अशी खात्री पटल्यानेच दूर- दूरहून मोडलेली, मुरगळलेली किंवा लचकलेली हाडे दुरुस्त करण्यासाठी रुग्ण येथे येत असतात. मान, पाठ, कंबर, मणका, गुडघा, ढोपर, घोटा आदी अवयवांच्या हमखास संपूर्ण वेदनामुक्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वरखडे हाडवैद्य यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये सातारा भूषण पुरस्कार, पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्कार, कुस्ती संघटनेचा गौरव पुरस्कार, कर्तव्यदक्षता पुरस्कार, इंटेलिजन्स हेल्थ अवॉर्ड, लोकमत एक्सलन्स अवार्ड आदी सन्मानाचा समावेश आहे.
या सर्व पुरस्कारांच्या बरोबरीनेच रुग्णांच्या चेहऱ्यावर दिसून येणारा वेदनामुक्तीचा आनंद हाच आपल्यासाठी खरा पुरस्कार आहे, असे सांगणारे समीर उर्फ सचिन वरखडे खऱ्या अर्थाने जमिनीवर पाय असणारे आणि अनेकांसाठी आदर्श ठरणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. “सचिन वरखडे हाडवैद्य” ही हाडांच्या उपचारातील एक “नाममुद्रा”च आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही, कारण हाडांच्या मोडण्या- तुटण्यावरील रामबाण मात्रा म्हणून अनेक जणांच्या तोंडी त्यांचे नाव येते.
सचिन वरखडे यांनी वेदना मुक्तीचा हा झेंडा अटकेपार नेला आहे. म्हणूनच परराज्य आणि परदेशातूनही उपचारासाठी रुग्ण त्यांच्याकडे येत असतात. वरखडे हाडवैद्य यांचे हे कार्य खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्याचा आणि वाई तालुक्याचा नावलौकिक वाढवणारे अद्वैतच आहे. समीर उर्फ सचिन वरखडे यांच्या वेदना मुक्तीच्या कार्यास त्रिवार सलाम…!!
संकल्प न्यूज माध्यम समूहाकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.













