लायन्स क्लब ऑफ सातारा गेंडामाळचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न
![]()
नूतन अध्यक्ष ला.आग्नेश शिंदे व सहकाऱ्यांनी स्वीकारला पदभार
सातारा / प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ सातारा गेंडामाळचा पदग्रहण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून या क्लबचे सन 2023-24 या वर्षीचे नूतन अध्यक्ष ला.आग्नेश शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्यांनी व त्यांच्या नूतन संचालक मंडळाने नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला
दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे डिस्ट्रिक्ट चेअरमन पी.आर.ओ.3234 डि-1 एम जे एफ ला. धैर्यशील भोसले यांच्या शुभहस्ते हा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. सातारा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष व सुप्रसिद्ध लेखक प्राचार्य
डॉ. विजयकुमार नलावडे यांचे यावेळी “छत्रपती संभाजीपुत्र शाहू महाराज” व्याख्यान झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुणे शहर प्रतिनिधी व दीपलक्ष्मी संस्था परिवाराचे कुटुंबप्रमुख
ला. शिरीष चिटणीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
रिजन चेअरमन रिजन 2 डि 3234 डि-1 बाळासाहेब शिरकांडे, झोन चेअरमन झोन-1 डि.3234 डि-1 बाळासाहेब महामुलकर, ला.अध्यक्ष राजेश चिटणीस, सचिव ला. सुनील बंबाडे खजिनदार ला. विनायक भोसले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
सदर पदग्रहण समारंभा प्रसंगी ला. एम.जे. एफ. धैर्यशील भोसले यांनी क्लबचे नूतन अध्यक्ष ला.आग्नेश शिंदे व सर्व संचालक मंडळांना त्यांना त्यांच्या कार्याची शपथ देऊन जबाबदाऱ्या अधिकार याची माहिती दिली.
अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर नूतन अध्यक्ष
ला.आग्नेश शिंदे म्हणाले, मी यावर्षीच क्लबचा सदस्य झालो
व अध्यक्ष पदाची सूत्रे ही स्वीकारली. हे सर्व काही क्लबमुळेच शक्य झाले आहे. येणाऱ्या कालावधीत या क्लबच्या माध्यमातून व सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने अनेक समाजपयोगी कामे आम्ही करणार असून या क्लबला एका उंचीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तसेच या क्लबच्या नावलौकिकत भर टाकण्यासाठी अविरत काम करणार आहोत. आपल्या कार्यकाळात या क्लबचा माईल स्टोन ठरलेला किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणे, कराओके गीत मैफिल, विविध चर्चासत्रे, व्याख्याने, आर्ट गॅलरी, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप यासारखे कार्यक्रम ठेवून शिरीष चिटणीस यांच्या कामाचा वारसा पुढे नेण्यासाठी क्लबच्या माध्यमातून काम करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
सातारा नगरीचे संस्थापक श्रीमंत शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतल्यानंतर डॉ. विजयकुमार नलवडे म्हणाले, या क्लबने निसर्ग व साहित्य या सारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे.
शिरीष चिटणीस म्हणाले, सक्तीचे सभासद करून घेऊन क्लब चालवलाजाणे योग्य नाही. परंतू सातारा गेंडामाळ क्लब उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या सभासदांचे उत्तम संघटन आहे आपणहून हा क्लब पुढे नेण्यासाठी काही मान्यवर सभासद पुढे आले आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे.
नूतन अध्यक्ष ला.आग्नेश शिंदे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले यावर्षी विजय साबळे यांच्याकडून ते गायन शिकले असून जयंत लंगडे यांच्याकडून पत्रकारितेचे शिक्षण घेऊन अजिंक्य संवाद या विद्यार्थी विशेषांकाचे संपादकही झाले आहेत. आगामी वर्षीचे अध्यक्षपद जयेंद्र जाधव यांच्याकडे असेल, असेही त्यांनी सांगितले.
क्लबचे नूतन सभासद प्रशांत कुलकर्णी, विश्वनाथ जरे, कौशिक कुलकर्णी, दावलसा सौदागर, अभिषेक कुलकर्णी हे क्लबच्या विविध कामांमध्ये सहभाग घेऊन क्लबचे नावलौकिक वाढवण्यात
अग्रेसर राहतील, अशी आशाही व्यक्ती केली.
बाळासाहेब शिरकांडे, बाळासाहेब महामुलकर, राजेश चिटणीस यांचीही यावेळी भाषणे झाली.
या कार्यक्रमाचे अप्रतिम सूत्रसंचालन ला.विनायक भोसले यांनी केले. आभारला.अभिनंदन मोरे यांनी मानले.













