Thu, Jan 15, 2026
प्रशासन

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात बनवडी गावाचा प्रथम क्रमांक

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात बनवडी गावाचा प्रथम क्रमांक
Ashok Ithape
  • PublishedAugust 11, 2023

सातारा दि. 11 : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये पुणे विभागामध्ये  कराड तालुक्यातील बनवडी  ग्रामपंचायतीने  प्रथम क्रमांक पटकवला आहे. या यशाबद्दल   मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी ग्रामपंचायतींचे सरपंच प्रदिप पाटील,उपसरपंच   नरहरी जानराव  माजी जि.प.सदस्य सागर शिवदास  व  सर्व ग्रामपंचायत सदस्य. ग्रामसेवक,   कर्मचारी व  ग्रामस्थ यांचे अभिनंदन केले आहे.

बनवडीचा घनकचरा प्रकल्प हा संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरला आहे. जिल्ह्यासह  राज्यातील अनेक गावांच्या ग्रामपंचायत सदस्यांनी या प्रकल्पास भेट दिली आहे. हा प्रकल्प पाहून अनेक गावांनी अशा पध्दतीचे घनकचरा प्रकल्प उभारले आहेत.

या प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला  आर्थिक स्थेर्यही मिळत आहे. त्यामध्ये गांडूळ खतापासून   मिळणारे उत्पन्न, सौर ऊर्जा द्वारे होणारा पाणी पुरवठा यांचा समावेश आहे.

बनवडी ग्रामपंचायतीचे घनकचरा व्यवस्थापन  व पाणी पुरवठा योजना राज्यास दिशादर्शक आहे. या कामातील त्यांचे सातत्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कामाबद्दल  त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन- श्री. ज्ञानेश्वर खिलारी

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!