Thu, Jan 15, 2026
प्रशासन

क्रांतिदिनी संपूर्ण जिल्ह्यात पंचप्रण प्रतिज्ञा उत्साहात

क्रांतिदिनी संपूर्ण जिल्ह्यात पंचप्रण प्रतिज्ञा उत्साहात
Ashok Ithape
  • PublishedAugust 9, 2023

सातारा दि. 9 (जि.मा.का.) –  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त संपूर्ण देशभ्र मेरी मीट्टी मेरा देश अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत क्रांतिदिनी संपूर्ण जिल्हाभर हातात मातीचे दिवे घेऊन मोठ्या उत्साहात पंचप्रण प्रतिज्ञा घेण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिलहाधिकारी प्रशांत आवटे यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तर जिल्हा परिषद सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांच्या उपस्थितीत पंचप्रण प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विविध खाते प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यातील विविध शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, अशासकीय संस्था, मंडळे यांनीही पंचप्रण प्रतिज्ञा घेतली. यावेळी भारतात 2047 पर्यंत विकसित देश बनविण्याचं स्वप्न साकारणे, गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकणे, देशाचा समृद्ध वारसाचा अभिमान बाळगणे, एका आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहणे, नागरिकांचे कर्तव्य बजावणे तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवणे यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!