“अजिंक्यतारा श्री” गणरायाला वाजत-गाजत दिला भावपूर्ण निरोप.
![]()
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी अर्जंव करीतच चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा आधीपती “अजिंक्यतारा श्री ” गणरायाला कार्यकारी संचालकांसह अधिकारी -कर्मचारी व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांनी वाजत-गाजत दिला भावपूर्ण निरोप.
भुईंज :- महेंद्रआबा जाधवराव
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर याहीवर्षी
मा. आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, (महाराजसाहेब) व मा. श्रीमंत छत्रपती सौ. वेदांतिकाराजे भोसले, (वहिनीसाहेब) यांच्या शुभहस्ते, चेअरमन मा.श्री. यशवंत साळुंखे अध्यक्ष व मा. संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
![]()
कार्यकारी संचालक मा. श्री. जिवाजी मोहिते यांच्या कल्पक व कुशल मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी पर्यंतच्या दहा दिवसाच्या काळात नित्य पूजा अर्चना याबरोबरच विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. सर्व कार्यक्रमाचे मंडळाचे अध्यक्ष प्रविण जाधव, उपाध्यक्ष भगवान पोवार खजिनदार तानाजी कदम सचिव पांडुरंग कुंभार आणि गणेशोत्सव मंडळ कार्यकारी समितीचे सर्व सदस्यांनी नेटके संयोजन केले होते.
आभाळ भरलं होतं तू येताना,
आता डोळे भरून आलेत तुला निरोप देताना.. अशा भावुक मनस्थितितच कार्यकारी संचालक श्री. जिवाजी मोहिते, चीफ केमिस्ट श्री. सुरेश धायगुडे, यांच्या शुभहस्ते तसेच लेबर ऑफिसर रणजित चव्हाण, सेक्रेटरी श्री. बशीर संदे, मंडळाचे अध्यक्ष प्रविण जाधव, कामगार युनियनचे अध्यक्ष कृष्णात धनवे, संगणक विभाग प्रमुख दिग्विजय पाटील, डिस्टलरी मॅनेजर दिनेश चव्हाण,वरिष्ठ कक्ष अधिकारी सयाजीराव पाटील,वरिष्ठ टाईम किपर राजाराम कणसे, सॅनिटेशन अधिकारी संजीवन कदम, केनयार्डचे प्रमोद कुंभार, माजी कामगार संचालक नितीन भोसले तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला.

गणपती बाप्पा जसे वाजत-गाजत येतात तसेच धूमधडाक्यात जातात. याच लयबद्ध वाद्यावर लाडक्या बाप्पाला निरोप देताना कार्यकारी संचालक श्री. जिवाजी मोहिते यांच्यासह अधिकारी व कर्मचारी थिरकले. फटाक्यांची अतिशबाजी आणि गुलालाची उधळण करीत बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची अर्जंव केली.
[ छाया :- सचिन पाटील ]













