जिल्हास्तरीय जम्प रोप स्पर्धेत बोरगाव विद्यालय प्रथम
वाई l प्रतिनिधी:
रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी देशभक्त आबासाहेब वीर सभागृह कवठे ता.वाई येथे झालेल्या जिल्हास्तरीय जम्प रोप स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव विद्यालयाने 20 गोल्ड मेडल व 3 सिल्व्हर मेडल मिळवून सातारा जिल्हयात प्रथम क्रमांक मिळविला. या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातील आठ तालुक्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता या स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर माजी सातारा जिल्हा परिषद सदस्य श्री संदिपभाऊ शिंदे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व भागातील जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.
30sec Double under
कु. आयुष् महांगडे 🥇
कु यश शिर्के🥇
कु अनुज महांगडे🥇
कुमारी शुक्रा कुंभार🥇
कुमारी यशदा वाडकर🥇
30sec. speed Event कु. अभय गोळे🥇
कु .श्रवण वाडकर🥇
कुमारी सई वाडकर🥇
कुमारी प्रिया वाडकर🥇
3 min. Endurance Event
कु .अनुज धनावडे🥇
कु. यश बावळेकर🥇
कु. साई पिलावरे🥇
कुमारी इवेंजली गावित 🥇
30sec single Bounce
कु. यश मालुसरे🥇
कु.तनय वाडकर🥈
कु.वेदांन सणस🥈
कु.समीर मानकुंबर🥇
कु. स्वराज हगवणे 🥇
कु. कृष्णा कापसे🥈
कुमारी नितेजा धनावडे🥇
कुमारी सई पोळ🥇
कुमारी सई गाढवे🥇
Free style
कुमारी भणगे अक्षरा 🥇
सर्व विद्यार्थ्यांना सातारा जिल्हयाचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नितिन तारळकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देवून त्यांचा सन्मान करण्यात आला .
खेळाडूंच्या या यशाबद्दल वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिनकरराव कांबळे उपाध्यक्ष श्री. नारायणराव वाडकर सचिव श्री. आनंदराव वाडकर सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक श्री संतोष वाडकर सर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,ग्रामस्थ व पालक यांनी आभार मानले व पुढील राज्यस्तर स्पर्धेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक अजित वाडकर यांचे मार्गदर्शन लाभले













