Thu, Jan 15, 2026
Media

पुणे विभागातील पत्रकारांनी अधिस्वीकृती पत्रिकेसाठी प्रस्ताव द्यावेत : अध्यक्ष हरिष पाटणे

पुणे विभागातील पत्रकारांनी अधिस्वीकृती पत्रिकेसाठी प्रस्ताव द्यावेत : अध्यक्ष हरिष पाटणे
Ashok Ithape
  • PublishedJuly 23, 2024

महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीची चौथी बैठक हरिष पाटणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी पुणे विभागाचे माहिती उपसंचालक तथा समितीचे सदस्य सचिव डॉ. राजू पाटोदकर, समितीचे सदस्य गोरख तावरे, चंद्रसेन जाधव, सुमित भावे, अमन सय्यद, पुणे जिल्हा माहिती अधिकारी मोघे, सातारा जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के आदी उपस्थित होते.

भुईंज : महेंद्रआबा जाधवराव

राज्य शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीने अधिस्वीकृती पत्रिकेसाठी आलेल्यापैकी पात्र २२ प्रस्ताव राज्य समितीकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आले. शासनाच्या वतीने देण्यात येणारी अधिस्वीकृती पत्रिका मिळण्यासाठी पुणे विभागातील पत्रकारांनी विहित नमुन्यातील अर्ज घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांसह पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा माहिती कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे
यांनी केले आहे.

बैठकीनंतर माहिती देताना पाटणे म्हणाले की, वृत्तपत्रे, वृत्तसंस्था, इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमे आणि इतर सर्व वृत्तप्रसारमाध्यम संस्था यामध्ये वार्तांकन, वृत्तसंकलनाचे काम करणाऱ्या प्रतिनिधींना राज्य शासनाकडून अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. यासाठी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

अधिस्वीकृती पत्रिकेचे अर्ज या समित्यांसमोर सादर केले जातात. कागदपत्रांची पडताळणी करून योग्य त्या अभिप्रायासह हे अर्ज विभागीय आणि राज्य समितीसमोर सादर केले जातात व त्यावर निर्णय घेतला जातो.

अधिस्वीकृती समितीची विभागीय स्तरावरील बैठक संपन्न झाली. यावेळी दाखल अधिस्वीकृती प्रस्तावांची छाननी होऊन त्यापैकी पात्र २२ प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य समितीकडे पाठविण्यात आले. विशेष म्हणजे या बैठकीत ग्रामीण भागातील पत्रकार सहकाऱ्यांना न्याय देता आला याचे आत्मिक समाधान मिळाल्याचेही पाटणे यांनी यावेळी सांगितले. तसेच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांनी या समितीवर काम करण्याची संधी दिली. त्यामुळेच आज काम करताना त्या पदाला न्याय देऊ शकतो आहे याचे मोठे समाधान
असल्याचे सांगून ही समिती भविष्यात आणखी अभिनव उपक्रम राबवेल असा विश्वास अध्यक्ष पाटणे यांनी यावेळी व्यक्त केला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!