महाराष्ट्र संपादक परिषदेचे आदर्श सन्मान 2024 चे पुरस्कार जाहीर
4 मे रोजी मुंबई येथे कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई : महाराष्ट्र संपादक परिषदेच्या वतीने पत्रकारिता गौरव आणि आदर्श पत्रकारिता सन्मान 2024 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 4 मे रोजी सायंकाळी 4.30 वाजता मुंबई येथे दादर माटुंगा कल्चर सेंटर जे. के. सावंत मार्ग येथे कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे यांनी दिली.
पत्रकारिता-साहित्य गौरव पुरस्कार मानकरी असे, सुधीर जाधव गजानन चव्हाण पुरस्कृत’ कै. प्रबोधनकार ठाकरे स्मृती साहित्य पुरस्कार’ झी २४ तास वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार, तटकरे विश्वस्त निधी पुरस्कृत ‘स्व. शि. म. परांजपे स्मृती पुरस्कार’ दैनिक ठाणे वैभवचे मिलिंद बल्लाळ, संपादक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर ‘आदर्श पत्रकारिता सन्मान पुरस्कार’ दैनिक संध्याकाळचे संपादिका रोहिणी खाडीलकर, दै. देशोन्नती पुरस्कार ‘स्व. नानासाहेब वैराळे स्मृती ज्येष्ठ संपादक पुरस्कार’ आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी महेश तिवारी,, दै. मुंबई लक्षदीप पुरस्कृत ‘आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार’ एबीपी माझाची ज्ञानदा कदम, दै. केसरी पुरस्कृत ‘लोकमान्य टिळक स्मृती पुरस्कार’ दैनिक पुण्यनगरीचे निवासी संपादक हेमंत जुवेकर, ‘स्व. डॉ. दादासाहेब काळमेघ स्मृती पुरस्कार’ महाराष्ट्र टाईम चे संपादक वैभव वझे, स्व. सुभाष आपटे परिवार पुरस्कृत ‘दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार’ सीएनएन न्यूज १८ चे ब्यूरो चीफ, विनया देशपांडे (पंडीत), कुल फाऊंडेशन फॉर सोशल इनिशिएटिव्ह पुरस्कृत, कै. श्रीमती भुरीबाई केसरीमलजी जैन पुरस्कार’ मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष जगदीश माधवराव कदम, ब्रह्या व्हॅली शैक्षणिक संकुल पुरस्कृत, ‘स्व. विष्णुशास्त्री चिपळुणकर स्मृती पुरस्कार’ दैनिक सकाळचे उपसंपादक महेश माळवे, भारती विद्यापीठ पुरस्कृत ‘स्व. गो. ग. आगरकर स्मृती पुरस्कार’ लोकवृत्तांचे संपादक एकनाथ बिरवटकर याना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
“विशेष पुरस्कार मानकरी” ज्येष्ठ साहित्यिक रविंद्र आवटी, नांदेड एकजूटचे संपादिका अनुराधा विष्णूपुरीकर, सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील आनंदराव (दादा) माईगडे, लोककला शाहीर रुपचंद चव्हाण यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र संपादक परिषदेचे संस्थापक वतीने स्व. यशवंत पाध्ये यांच्या स्मरणार्थ आदर्श पत्रकारिता साहित्य सन्मान-२०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. समारंभाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे, प्रमुख उपस्थिती देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, ज्येष्ठ साहित्यिक रविंद्र आवटी उपस्थित राहणार आहेत, सुत्रसंचालन सुसंवादिनी शिवानी जोशी करणार आहेत.
महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष संजय मलमे, उपाध्यक्ष गजानन चव्हाण, उपाध्यक्ष सुधिर जाधव, कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे, सचिव एकनाथ बिरवटकर, कोषाध्यक्ष अनंत पाध्ये यांनी कार्यक्रमाची माहिती दिली असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.













