रोटरी क्लब ऑफ वाईच्या माध्यमातून सावित्रीच्या लेकिंना सायकल वाटप, २५ शाळांना पुस्तकांचे वितरण
![]()
सायकलमुळे शिक्षणाचा मार्ग मोकळा, मुलींच्या चेहऱ्यावर फुलला आनंद. सायकल वाटप कार्यक्रमासह वाचन चळवळ उपक्रमांतर्गत पुस्तकांचीही भेट.
रोटरी क्लब ऑफ वाईला, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकळ यांची उपक्रमाअंतर्गत भेट. यावेळी वाई परिसरातील शाळांमधील विद्यार्थिनींना लांबचा प्रवास करून किंवा पायी शाळेत यावे लागते अशा विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
या सर्व सायकलींची सायकल बँक तयार करून त्यांचे दरवर्षी आवश्यकते नुसार मुलींना हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. अशी माहिती यावेळी क्लबच्या अध्यक्ष रो. प्रेरणा ढोबळे यांनी दिली
हा सायकल बँक चा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून रोटरी क्लब वाईने शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना फार मोठी मदत केली आहे अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या.
या सोबतच सीएसआर ग्रँड मधून डिस्ट्रिक्ट ३१३२ ने केलेल्या मदतीमधून २५शाळांना ग्रंथालय कपाटे देण्यात आली होती. त्याचाच पुढील टप्पा म्हणून रत्नानीधी फाउंडेशन, मुंबई यांच्यामाध्यमातून तालुक्यातील शाळांना ग्रंथालय सुरू करण्यासाठी पुस्तके देण्यात आली.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स ऑफिशीअल व्हिजिटच्या या कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.स्वाती हेरकळ या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, सहाय्यक प्रांतपाल रो. डॉ. शंकर गोसावी आणि डिजी व्हिजिट डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी, प्रमोद शिंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात रोटरीच्या प्रथे प्रमाणे मीटिंग कॉल टू ऑर्डर आणि त्यानंतर राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन आनंदी वृक्षाला पाणी घालून करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ वाईचे अध्यक्ष रो.डॉ. प्रेरणा ढोबळे यांनी पूर्ण झालेल्या सर्व उपक्रमाविषयीची माहिती दिली. यातून 12 हजारापेक्षा जास्त लोकांना लाभ झाला असून एक कोटी रुपयांनापेक्षा जास्त रकमेचे प्रकल्प यशस्वीपने राबविण्यात आले आहेत या विषयी मार्गदर्शन केले.
डिस्ट्रिक प्रांतपाल रो. स्वाती हेरकळ यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले, समाज विकासाच्या कामात रोटरी क्लब ऑफ वाईचे योगदान मोठे आहे. शिक्षण, आरोग्य, कृषी, सामाजिक या क्षेत्रांत केलेले कार्य विशेष वाखाणण्याजोगे आहे. तळागाळातील समाजासाठी रोटरीतर्फे राबविण्यात येत असलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. ही संस्था सामाजिक क्षेत्रातील आदर्श संस्था आहे अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच रोटरीच्या उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. क्लबचे सचिव रो. संतोष निकम यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे सुश्राव्य सूत्रसंचालन रो. डॉ. जितेंद्र पाठक आणि रो.अर्चना पाठक यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व शाळेचे शिक्षक, विद्यार्थिनी त्यांचे पालक, वाई रोटरी क्लबचे सदस्य आणि सर्व मेंबर्स, पत्रकार, वाईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.













