Mon, Mar 2, 2026
राजकीय बातमीपत्र

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त विविध कागदपत्रांच्या आधारावर करता येणार मतदान

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त विविध कागदपत्रांच्या आधारावर करता येणार मतदान
Ashok Ithape
  • PublishedMarch 29, 2024

सातारा दि. 27 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहे. मतदान केंद्रावर त्यांची ओळख पाटविण्यासाठी छायाचित्रासह मतदान ओळखपत्र सादर करावीत. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करु शकत नाही अशा मतदारांनी ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त विविध कागदपत्रे सादर करुन मतदान करु शकतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी कळविले आहे.

यामध्ये आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक/पोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तएवेज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार यांनी जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष दिव्यांग प्रमाणपत्र या कागदपत्रांच्या आधारे मतदारांना लोकसभा-2024 साठी मतदान करता येणार आहे, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी कळविले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!